Goa Congress Press Conference  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: कंपन्यांच्या वसुलीकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष; सर्वसामान्यांना मात्र त्रास

Amit Patkar: राज्यावरील आर्थिक बोजा आता ३६ हजार कोटींचा झाला असून प्रत्येक गोमंतकीयांवर २.४० कोटींचे कर्ज आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पाणी आणि वीज जोडण्या तोडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत असंवेदनशील आणि अमानुष सरकार सर्वसामान्यांना त्रास देत आहे. मात्र, क्रोनी कंपन्यांकडून १०१८७.६२ कोटी रुपये वसूल करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस जितेंद्र गावकर, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा उपस्थित होते.

आम्ही मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना पत्र लिहून मागणी केली आहे, की सरकारने या मोठ्या थकबाकीची वसुली त्वरित सुरू करण्यासाठी पावले उचलावीत.

ज्या कंपन्यांनी प्रलंबित थकबाकी भरली नाही, अशा सर्व कंपन्यांना गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली संमती आणि विविध सरकारी प्राधिकरणांनी दिलेल्या परवानग्या सरकारने तात्काळ मागे घ्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे पाटकर म्हणाले.

राज्यावरील आर्थिक बोजा आता ३६ हजार कोटींचा झाला असून परिणामी प्रत्येक गोमंतकीयांवर २.४० कोटींचे कर्ज आहे. सरकारच्या चुकीच्या वित्तीय व्यवस्थापनामुळे राज्य दिवाळखोरीत गेले आहे आणि सामान्य लोकांना आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांमुळे विविध कंपन्यांकडून हजारो कोटींच्या वसुलीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असेते म्हणाले.

‘थकबाकी वसूल करा किंवा वीज जोडण्या तोडा’

अदानी, वेदांता, जेएसडब्ल्यू आणि कॅसिनोचालक यांसारख्या बड्या कंपन्यांच्या या मोठ्या थकबाकीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. खाण थकबाकीदारांना देण्यात आलेले वाहतूक परवाने, निर्यात परवाने, खाणी चालवण्याची संमती इत्यादी सर्व परवानग्या सरकारने मागे घ्याव्यात. तसेच औद्योगिक, व्यावसायिक थकबाकीदारांची वीज कनेक्शने तात्काळ खंडित करावीत व कॅसिनोंचे परवाने रद्द करावेत तसेच थकबाकी असल्याने कोळसा वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी आम्ही मुख्य सचिवांना निवेदनाद्वारे केली असल्याचे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT