Mandrem Congress: अधिकारी गावस यांनी हे खड्डे दिवसांत बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले
Goa Mandrem CongressDainik Gomantak

Goa Congress: मांद्रेतील खड्डे आठ दिवसांत बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन

Mandrem Congress: अधिकारी गावस यांनी हे खड्डे दिवसांत बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले
Published on

पेडणे: मांद्रे काँग्रेस गट समितीतर्फे पेडणे तालुका सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे अधिकारी शिवनाथ गावस यांना मांद्रे मतदारसंघातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आठ दिवसांत बुजवावेत अन्यथा पुढील कृती करण्यात येऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मांद्रे काँग्रेस गटाध्यक्ष नारायण रेडकर आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून दिला.

मांद्रे व पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वेळोवेळी सूचना करून व निवेदने देऊनही सरकारी अधिकारी जुमानत नसल्याने हे खड्डे आता मृत्यूचे सापळे बनले आहे. मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे.

दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन या रस्त्याने वाहतूक करावी लागत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता शोधणे मुश्किल होऊन बसले आहे. चार दिवसांपूर्वी मांद्रे काँग्रेसच्या वतीने पेडणे सार्वजनिक रस्ता विभागाचा मांद्रे मतदारसंघात पडलेल्या खड्ड्यांबद्दल आवाज उठवून निषेध करण्यात आला होता.

Mandrem Congress: अधिकारी गावस यांनी हे खड्डे दिवसांत बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले
Mandrem News : मांद्रे भाजप गटातर्फे मूर्तिकारांना माती मळण्याच्या यंत्रांचे वितरण

नारायण रेडकर यांनी मांद्रे मतदारसंघात पडलेले खड्डे केव्हा बुजवणार असा प्रश्न करून वेळोवेळी नागरिकांचे मागणी होती. मात्र, तुम्ही हे खड्डे का बुजवले नाहीत. पावसाळा आल्यानंतर सरकारला का जाग येते? या खड्ड्यात पडून अपघात होऊन एखाद्याचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? सरकार आणि तुम्ही जबाबदारी घेणार का? असे प्रश्न शिवनाथ गावस यांना विचारले.

पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे अधिकारी शिवनाथ गावस यांनी हे खड्डे येत्या काही दिवसांत बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले.

Mandrem Congress: अधिकारी गावस यांनी हे खड्डे दिवसांत बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले
Goa Congress: ‘सनबर्न’ला काँग्रेसचा कडाडून विरोध

‘विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार’

नारायण रेडकर म्हणाले, की मांद्रे मतदारसंघात आणि पेडणे मतदारसंघात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग तसेच पंचायत आणि अन्य खात्यांत भ्रष्टाचार होत आहे. काम न करता एकाच कामावर तीन तीन वेळा बिले करून हे पैसे सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून उकळण्यात येत आहेत. याबाबत आपण जे यात सामील आहेत, त्यांना उघडे पाडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com