Mahadayi Water Dispute | Congress Slams Goa government  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: ज्वलंत म्हादई प्रश्‍नावरून भाजप नेत्यांचे मौन का? काँग्रेसचा सरकारवर घणाघात

कॉंग्रेसचा सरकारवर विश्‍वासघाताचा आरोप

दैनिक गोमन्तक

Congress Slams Goa government on Mahadayi Water Dispute: म्हादईच्या ज्वलंत मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यातील नेत्यांनी घेतलेले मौन  म्हणजे डबल इंजिन सरकारने  म्हादई कर्नाटकात वळविण्यास परवानगी दिल्याची पुष्टी च आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव  यांनी केली.

काँग्रेस भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर,  प्रसिद्धी माध्यम विभागाचे  अध्यक्ष अमरनाथ पणजीकर,  महिला अध्यक्षा बीना नाईक यांची उपस्थिती होती.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत  मते मिळवण्यासाठी भाजपने गोव्याच्या हिताशी तडजोड केली. म्हादईच्या मुद्द्यावरून  ‘भ्रष्ट जुमला पक्षा’ने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला. कर्नाटकने येथील नेत्यांच्या संगनमताने आधीच पाणी  वळवले  आहे.

कर्नाटकात प्रचार करताना शहा यांनी कर्नाटकला आधीच पाणी दिल्याचे स्पष्ट केले होते. गोव्यातील सभेत त्यांनी म्हादईवर मौन धारण केले. यावरून त्यांनी कर्नाटकात जे सांगितले ते सत्य आहे आणि म्हादई त्यांनी वळवली आहे’, असा आरोप काँग्रेसने यावेळी केला.

नेमका कोणावर विश्‍वास ठेवणार?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे इतर आमदार  शहा यांच्याबरोबर सभेला  उपस्थित  होते. त्यांनी शहांना या म्हादईवर प्रश्‍न विचारण्याचे धाडस केले नाही.

मुख्यमंत्री म्हणतात, चार महिन्यांत खाणकाम सुरू करणार आणि शहा म्हणतात, पुढील एका वर्षात हा व्यवसाय सुरू करणार, यावरून कोणावर विश्‍वास ठेवायचा?, असा प्रश्न आलेमाव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT