South Goa Loksabha Dainik Gomantak
गोवा

South Goa Loksabha: पारंपरिक मतांवर काँग्रेसचा भरवसा; दक्षिण गोव्यामध्ये वाढली चुरस

South Goa Loksabha: ‘आरजी’ मुळे काँग्रेससह भाजपलाही मतविभागणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोव्यात भाजपच्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला. काँग्रेसने उशिरा उमेदवार जाहीर केला. पण काँग्रेसची पारंपरिक मतांवर भिस्त आहे. तसेच ‘आप’ व ‘गोवा फॉरवर्ड’च्या पाठिंब्याचा लाभही त्यांना होणार आहे.

‘आरजी’ मुळे काँग्रेससह भाजपलाही मतविभागणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे.

दक्षिण गोव्यातील जागा जिंकण्यासाठी भाजपकडून - आटोकाट प्रयत्न होत आहेत. फातोर्डा, बाणावली, वेळ्‍ळी, कुंकळ्ळी, केपे हे वगळता इतर सर्वत्र भाजपचे तसेच भाजप समर्थक आमदार आहेत. कुडतरीचे रेजिनाल्ड व कुठ्ठाळीचे वाझ यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे.

पक्षांतरामुळे झालेल्या बदलाचा लाभही भाजप करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नुवेचे आमदार सिक्वेरा यांनी एका कार्यक्रमात कामत हेच सासष्टीचे नेते असल्याचे म्हटले होते. दक्षिण गोव्यात कामत यांचा जनसंपर्क आहे. याचा लाभ भाजपला होईल.

वेळ्ळी व बाणावली ‘आप’कडे असून ‘आप’ची काँग्रेसशी आघाडी आहे. फातोर्डा गोवा फॉरवर्डकडे असून सरदेसाई यांचा विरियातोंना पाठिंबा असल्याने हा काँग्रेसला लाभ होईल.

‘आरजी’मुळे मतांवर परिणाम

‘रिव्होल्युशनरी गोवन्स’कडून यापूर्वीच दक्षिण गोव्यासाठी रुबर्ट परेरा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद मोठा होता. आताही पक्षाची ताकद जोखण्याचा प्रयत्न आरजीचा आहे. ‘आप’ने काँग्रेसशी आघाडी केलेली आहे.

शिवाय गोवा फॉरवर्डनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिणेतील लढत ही चुरशीची होणार हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT