Congress Goa Alliance Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Alliance: 'आरजी'सह गोवा फॉरवर्डला सोबत घेण्‍यास काँग्रेस तयार! जागावाटपाच्‍या बैठकांना गुरूवारपासून सुरवात

Goa Congress: आपल्‍या दबावासमोरही काँग्रेस झुकत नसल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी ‘आप’सोबत काडीमोड घेत, काँग्रेससोबतच जाण्‍याचे निश्‍चित केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: येत्‍या विधानसभा निवडणुकीत रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍ससह (आरजी) गोवा फॉरवर्डसोबतही आघाडी करण्‍याचे काँग्रेसने निश्‍चित केले आहे; परंतु या दोन्‍ही प्रादेशिक पक्षांनी मिळून एकूण १८ जागा मागितल्‍याने काँग्रेसने सावध पवित्रा घेतला असून, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘आरजी’ने दावा केलेल्‍या बारा मतदारसंघांतील गट समित्‍यांच्‍या प्रमुखांशी बैठका घेण्‍यासही सुरवात केली आहे.

सत्ताधारी भाजपला पराभूत करण्‍यासाठी विरोधी पक्षांची आघाडी व्‍हावी, अशी भूमिका आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी सुरवातीपासूनच मांडली; परंतु काँग्रेसकडून त्‍याबाबत योग्‍य प्रतिसाद मिळत नसल्‍याने त्‍यांनी आम आदमी पक्षासोबत (आप) आघाडी करण्‍याचा निर्णय घेत काँग्रेसवर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केला.

आपल्‍या दबावासमोरही काँग्रेस झुकत नसल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी ‘आप’सोबत काडीमोड घेत, काँग्रेससोबतच जाण्‍याचे निश्‍चित केले आहे. शिवाय आघाडीत गोवा फॉरवर्डला सहा जागा मिळाव्‍या, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्‍यान, काँग्रेस प्रभारी तथा आघाडी समितीचे अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे गुरुवारी गोव्‍यात दाखल होणार असून, ते ‘आरजी’ आणि गोवा फॉरवर्डच्‍या वरिष्‍ठांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत; पण आघाडीतील जागावाटपाचा तिढा डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यातच सुटेल, असेही सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपमध्ये येण्यास विरोधक उत्सुक! दामू नाईक यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, 'योग्य वेळी नावे जाहीर करू'

VIDEO: पॅट कमिन्सच्या सुखी संसारात मिठाचा खडा? उस्मान ख्वाजाच्या खुलाशानंतर पत्नीशी वाद? सिडनीच्या रस्त्यावरील भांडणाचा व्हिडीओ समोर

बंगळूरू ते मडगाव प्रवास होणार अधिक वेगवान! शुक्रवारपासून 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची सेवा सुरू; पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

Woman Assault: म्हापसा, काणकोणनंतर आता कुडचडे हादरले! महिलेला डोंगराळ भागात नेऊन लैंगिक अत्याचार; संशयित पोलिसांच्या ताब्यात

EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या दुरुस्त करा पीएफ खात्यातील चुका; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT