Mallikarjun Kharge Goa visit Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस अध्यक्ष खर्गे सोमवारपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, संघटनात्मक तयारीवर दक्षिण गोव्यात होणार 'पीएसी'ची महत्त्वपूर्ण बैठक

Mallikarjun Kharge Goa visit: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आजपासून (ता. १७) दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आजपासून (ता. १७) दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून खर्गे हे पहिल्यांदाच गोव्यात येत आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे हा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दक्षिण गोव्यात बैठका व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केल्याने खर्गे दोन्ही दिवस दक्षिण गोव्यातच राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पहिल्यांदाच गोव्यात येत आहेत. त्यांच्या आगमनामुळे काँग्रेसच्या गोटात नवा उत्साह संचारला आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांची माहिती प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी दिली. याप्रसंगी त्यांच्याबरोबर तुलियो डिसोझा यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत कवठणकर म्हणाले, दुपारी साडेतीनच्या सुमारास खर्गे यांचे बांबोळी येथे आगमन होईल. त्यानंतर ते थेट वेर्णा येथील काँग्रेसच्या बीएलए आणि बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करतील. ‘क्विंटा दे वालादारेस’ सभागृहात ही बैठक पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. १८) दक्षिण गोव्यात पक्षाची निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक तयारीबाबत चर्चा करण्यासाठी ‘पीएसी’ची बंद दाराआड बैठक होईल.

दरम्यान, ‘वंदे मातरम्’वरून सुरू झालेल्या वादावर कवठणकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या वादाचे वर्णन ‘खोटा प्रचार’ असे केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलता किंवा पुसता येत नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT