Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Honda Valpoi road stray cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा वावर वाढला असून, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Stray Cattle
Stray CattleDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वाळपई: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा वावर वाढला असून, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध गुरे बसत असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक लावण्याची किंवा वाहन वळविण्याची वेळ येते.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आयआरबी कॅम्पस-वाळपई, एसीजीएल बसथांबा, आयडीसी रस्ता जंक्शन, पिसुर्ले जंक्शन आणि होंडा पोस्ट या परिसरात भटकी गुरे वारंवार मुख्य रस्त्यावर बसलेली आढळतात. वाहनांची वर्दळ किंवा मोठा आवाज असूनही अनेकदा गुरे रस्त्यावरून बाजूला होत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना वेग कमी करून किंवा वाहन वळवून मार्ग काढावा लागतो.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

भटकी गुरे वारंवार मुख्य रस्त्यावर येत असल्याने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

रस्त्यावर येणाऱ्या गुरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासह त्यांचा रस्त्यावरील वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्‍यात येत आहे.

Stray Cattle
Goa Tourism: पर्यटन हंगामात यंदा दाबोळीत 144 चार्टर्ड विमाने! 26 हजार परदेशी पर्यटक येणार, विमानतळ प्रशासनाची माहिती

अंधारात गुरे दिसेनात; अचानक ‘ब्रेक’

रात्रीच्या वेळी होंडा-वाळपई मार्गावरील काही भागांत प्रकाशाची कमतरता जाणवते. त्यामुळे रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांना दूरवरून दिसत नाहीत. जवळ आल्यानंतर अचानक गुरे समोर आल्याने ब्रेक लावावा लागतो. दुचाकीस्वारांसाठी ही स्थिती धोकादायक ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com