Churchill Alemao Dainik gomantak
गोवा

फॉर्मेलीन माफियाला हाताशी धरून मला पराभूत करण्याचे काँग्रेसचे डावपेच

दिनेश गुंडू राव यांना हाताशी धरून आपल्या मर्जीतील टोनी डायस यांना उमेदवारी दिली

दैनिक गोमन्तक

मडगाव : फॉर्मेलीन माफिया मौलाना इब्राहिम याला हाताशी धरून दिगंबर कामत आणि मायकल लोबो मला बाणावलीत पराभूत करण्याची स्वप्ने रंगवत आहेत. मात्र बाणावलीकरावर माझा भरोसा आहे. तेच मला पुन्हा निवडून देतील असा विश्वास बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी व्यक्त केला.

गोव्यात लोकांना फॉर्मेलीन मुक्त मासळी मिळावी यासाठी 2018 मध्ये मी त्याविरुद्ध आवाज उठविला होता. त्यामुळे इब्राहिम माझ्यावर नाराज आहेत. त्यासाठीच त्यांनी दिनेश गुंडू राव यांना हाताशी धरून आपल्या मर्जीतील टोनी डायस यांना उमेदवारी दिली. आता कोलवा येथे फिरून हाच इब्राहीम चर्चिलला पाडा असे सांगत फिरत आहे असा आरोप केला.

मात्र बाणावलीचे मतदार त्याला बळी पडणार नाहीत. ही माझी शेवटची निवडणूक (Election) असून माझे बाणावलीकर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किनारपट्टी नियोजन आराखडा विरोधी आंदोलनाचे नेते रॉय बार्रेटो यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारने मच्छिमारांना घरे बांधण्यासाठी कुटुंबाचे सर्वेक्षण करून अनुमती द्यावी. पूर्वीच्याच जागेत घर बांधण्याची सक्ती करू नये अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT