Priyanka Gandhi Dainik Gomantak
गोवा

एकजुटीने राहा, गुलाल आपलाच!

हातात हात घालून काम करणार, तेव्हाच आम्ही येणारी विधानसभा निवडणूक जिंकणार, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी केले.

दैनिक गोमन्तक

वास्को : गोव्यात (Goa) काँग्रेसची सत्ता आल्यावरच गोव्याची संस्कृती टिकून राहील. गोव्याचा आवाज राहील, गोवा हा गोमंतकीय जनतेच्या हातात राहील. काँग्रेस पक्ष (Congress) हा लोकांचा आवाज ओळखतो, काँग्रेस पक्ष जो काय निर्णय घेतो, तो गोव्याच्या लोकांच्या हितावहच असतो. तेव्हा आम्हाला आता बरोबर काम करायचे आहे. हातात हात घालून काम करणार, तेव्हाच आम्ही येणारी विधानसभा निवडणूक जिंकणार, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी केले.

चिखली-दाबोळी (Dabolim) येथे काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रियांका गांधी बोलत होत्‍या. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिनेश गुंडुराव, केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेसचे नेते दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड, फ्रान्सिस्को न्युनीस व अन्‍य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कॅप्टन विरियाटो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

इथे खूप पक्ष आले आहेत. त्‍यांची मानसिकता हीच आहे की, समाजापेक्षा आपल्या पार्टीला मोठे करणे. गोव्यात बदल घडवायचा असेल, विकास घडवून आणायचा असेल तर जनतेची कामे आणि विकासाच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पक्षालाच मत द्या. गोवा पर्यावरण नष्ट करणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करू नका.

- प्रियांका गांधी (Priyanka Gandhi), काँग्रेसच्या सरचिटणीस

गोमंतकीयांसाठी झटणाऱ्यांना प्राधान्‍य द्या

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्ष महत्त्वाचे निर्णय घेतो. आम्हाला बंगाली पार्टी नको, तसेच दिल्लीची पार्टी नको, आम्हाला पाहिजे काँग्रेस पार्टी. जी गोव्यासाठी, सर्वसामान्‍य नागरिकांसाठी वावरते, झटते. सध्याचे सरकार लोकांचा आवाज दाबून टाकत आहे. त्यांना यापुढे सत्तेवर करण्याचा कोणताही हक्क नाही. तेव्हा येणारे सरकार हे काँग्रेसचेच सरकार असणार, असा आम्ही ठाम निर्धार करूया, असे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. यावेळी कॅप्टन विरियाटो यांनी विचार मांडले व काँग्रेस प्रवेश दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत क्लेट डिसोझा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT