मडगाव: एका बाजूने गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Goa) पक्ष काँग्रेसशी युती करण्याची भाषा बोलत असताना दुसऱ्या बाजूने काँग्रेस सोडून भाजपात (BJP) गेलेल्या आमदारांना येत्या निवडणुकीत उमेदवारीही देऊ पाहत आहे, या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार फ्रांसिस सार्दीन यांनी काँग्रेसला त्या 10 आमदारांची गरज नाही असे मत व्यक्त केले. (Congress MP Francis Sardine has castigated 10 MLAs who left the Congress)
शुक्रवारी त्यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना या 10 आमदारांना घेणाऱ्या पक्षा बरोबर तुम्ही युती करणार का असे विचारले असता, आम्हाला त्या 10 आमदारांची मुळीच गरज नाही असे ते म्हणाले.सार्दीन म्हणाले, सध्या गोव्यात जे सरकार सत्तेवर आले आहे त्यांना लोकांनी सत्तेवर आणलेले नाही तर काँग्रेस पक्ष फोडून त्यांनी हे सरकार घडविले आहे. हे सरकार लोकविरोधी असल्याने गोव्यातील जनता या सरकारवर नाराज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काँग्रेसची युती होणार का असे विचारले असता ते म्हणाले, हा निर्णय घेण्यास अजून वेळ बाकी आहे. मात्र गोव्यात राष्ट्रवादीशी युती करण्यासाठी त्यांच्याकडे एक आमदार सोडल्यास आणखी कोण आहे असा सवाल त्यांनी केला. त्यांचा एकमेव आमदार चर्चिल असलेमाव स्वतःच सध्या भाजप बरोबर आहे. मग युती कुणा बरोबर करायची असा सवाल त्यांनी केला. ही युती झाल्यास राष्ट्रवादीसाठी काँग्रेसने किमान 10 जागा सोडण्याची गरज चर्चिल यांनी व्यक्त केली होती.
चर्चिल आलेमाव यांनी सर्व निधर्मी पक्षांनी एकत्र येऊन येणारी निवडणूक लढवायला पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्याची खिल्ली उडवताना, चर्चिल स्वतः निधर्मी आहेत का असा सवाल त्यांनी केला. चर्चिल आलेमाव हे आपण या भाजप सरकारला मुद्द्यावर पाठिंबा देतो असे सांगतात. पण या सरकारच्या विरोधात जाण्यासाठी कदाचित त्यांना निवडणुकीच्यावेळी मुद्दे सापडतील असेही त्यांनी मिश्कीलपणे म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.