Sankalp Amonkar dainik gomantak
गोवा

MLA Sankalp Amonkar: मतदारांना विश्वासात घेऊनच भाजपात प्रवेश केला

दैनिक गोमन्तक

वास्को: भाजपात प्रवेश करण्याचा माझा एकट्याचा निर्णय नसून माझ्या मतदारांना विश्वासात घेऊनच भाजपात प्रवेश केला आहे. मुरगांव मतदार संघातील विकास कामांना चालना देण्यास तसेच मतदारांची कामे करण्यासाठी सत्तारूढ सरकारात प्रवेश करणे मी हितावह समजले अशी प्रतिक्रिया मुरगाव आमदार संकल्प आमोणकर यांनी हेडलँड सडा येथे दिली.

( congress Mormugao MLA Sankalp Amonkar goa BJP entere)

काँग्रेसच्या आठ आमदारांनी आज भाजपात प्रवेश केला. यात मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचाही सहभाग आहे. दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर संकल्प आमोणकर यांनी सरळ हेडलँड, सडा येथे गणपती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, साईबाबा मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. नंतर ते आपल्या कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या स्वागतार्थ कार्यकर्ते जमले होते. यावेळी फटाके वाजवून संकल्प आमोणकर यांचे स्वागत करण्यात आले.

काहींनी मिठी मारून तर काहींनी पुष्पगुच्छ देऊन संकल्प आमोणकर यांचे स्वागत केले. यावेळी आमदार आमोणकर पुढे बोलताना म्हणाले की, आता मुरगाव मतदार संघाला बळकटी आली आहे. कारण माझे मतदार तसेच भाजपा प्रणित कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत. भाजपचे जे कार्यकर्ते अध्यक्ष आहेत त्यांनी बरोबर मिळून काम करणे गरजेचे आहे. मी माझ्या जाहीरनाम्यात विकास कामे दिली आहेत ती मी आता पूर्ण करणार आहे. असे ते म्हणाले.

दरम्यान संकल्प आमोणकर यांचे हेडलँड सडा येथे धिम्यागतीने स्वागत झाले. कार्यकर्त्यामध्ये तेवढा उत्साह दिसून आला नाही. काँग्रेस कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून मुरगाव, वास्कोत उलट सुलट चर्चा सुरू होती. कोणाच्या तोंडून आमोणकर यांनी भाजपात प्रवेश करण्याचा योग्य निर्णय घेतला असे म्हणत होते. तर संकल्प आमोणकर यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला संकल्प भाजपात जायलाच पाहिजे होता. माजी मंत्री मिलिंद नाईक यांची चांगली जिरली, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

आमदार संकल्प आमोणकर यांचे खंदे समर्थक तथा समाजसेवक शंकर पोळजी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, म्हटले की, आज जेव्हा आपल्या मातृभूमी गोव्याला महागाई, बेकायदेशीररित्या वाढती गुन्हेगारी, कोळसा समस्या, आयआयटी सांगे समस्या, जंगलतोड, खाणकाम, खाजगीकरण, खाणबंदी या विरोधात आवाज उठवण्यासाठी चांगल्या राजकारण्याची गरज होती.

तसेच नोकरीचा मुद्दा इत्यादी काँग्रेसच्या राजकारण्यांनी पक्षातून पक्षांतर करून मतदारांचा विश्वास घात केला आहे. आज गोव्याला खरा अर्थाने तीव्र विरोधाची गरज आहे. या लोभी राजकारण्यांनी केलेल्या पक्षांतराला माझा तीव्र विरोध आहे.

तृणमूल काँग्रेस उमेदवार जयेश शेटगावकर म्हणाले की, काँग्रेसच्या आमदाराने मतदारांची अक्षरशा फसवणूक केली आहे. एकाच उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी ही मतदारावर असते. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस कधीच गंभीर नव्हती हे आजच्या नाट्यावरून कळले.

समाजसेवक आरटीआय कार्यकर्ता, परशुराम सोनुर्लेकर म्हणाले की, मुरगावच्या जनतेने भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसच्या उमेदवाराला स्पष्ट बहुमत दिले आणि काँग्रेसच्या आमदाराने मतदार संघाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आमदार करतील या आशेने मुरगावच्या जनतेचा पराभव केला. कारण ते केवळ मतदारसंघाचा विकासासाठी भाजपमध्ये गेले होते.

माझी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले, हे सर्व नाट्य होणार होते हे सगळ्यांनाच माहीत होते. हे सगळे आमदार भाजपात गेले हे बरे झाले. लोकांनाही कळायला हवे, त्याने शपथ घेऊन काय केले ? लोकांची फसवणूक केली. मुरगाव तालुका हा काँग्रेस प्रणित तालुका आहे. वास्को दाबोळी, मुरगाव, कुठ्ठाळी मतदारसंघाला आता बळकटी येणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत या फुटीरांचा भाजपला त्रास होणार हे नक्की. हे आमदार भाजपात गेल्याने काँग्रेसला बळकटी आली आहे.

माझी महसूल मंत्री जुझे फिलीप डिसोझा म्हणाले, ही आश्चर्याची गोष्ट नाही. हे पूर्वीच होणार होते. मात्र जरा उशीर झाला. काँग्रेसच्या प्रमुखांच्या चुकीमुळे हे सर्व घडले असे मी म्हणेन. कारण हे लीडर निवडणुकीपूर्ती येतात व शो करतात. मी फुटीर आमदारांना दोष देणार नाहीं. काँग्रेस लीडरशिप संपली आहे. गोव्याच्या लोकांना काँग्रेस पक्षाने सांगावे लागणार, त्यांची मनधरणी करावी लागणार, कारण देवापुढे शपथ घेऊन या काँग्रेसच्या फुटीर आमदारांनी मोठी घोडचूक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT