Ram Mandir Ayodhya Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

राम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा! गोवा विधानसभेत राजीव गांधी आणि शरद पवारांचा उल्लेख का झाला?

Ram Mandir Ayodhya Goa Assembly Session: 22 जानेवारी धार्मिक सलोखा दिवस म्हणून घोषित करण्यासह सुट्टी देण्याचा साळकर यांचा प्रस्ताव

Pramod Yadav

Ram Mandir Ayodhya Goa Assembly Session

अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली हा दिवस धार्मिक एकचार दिवस (धार्मिक सलोखा दिवस) म्हणून घोषित करावा तसेच, या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी गोवा विधानसभेच्या अधिवेशनात खासगी प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावातील सुट्टीच्या मागणीला आमदार वेंझी व्हिएगस, विजय सरदेसाई, आल्टन डिकॉस्टा आणि क्रूझ सिल्वा यांनी विरोध दर्शवला.

अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन तसेच, हा दिवस गोव्यात धार्मिक सलोखा दिवस म्हणून घोषित करावा आणि या दिवशी सुट्टी जाहीर करावी, असा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला.

यावर चर्चा करताना आमदार उल्हास तुयेकर, दिगंबर कामत, मायकल लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस, नीलेश काब्राल यांनी या प्रस्तावाला समर्थन दिले.

तर, या प्रस्तावातील सुट्टीच्या मागणीला आमदार वेंझी व्हिएगस, विजय सरदेसाई, आल्टन डिकॉस्टा आणि क्रूझ सिल्वा यांनी विरोध दर्शवला.

आल्टन डिकॉस्टा यांनी राम मंदिरात काँग्रेसचे देखील योगदान असल्याचा उल्लेख करत देशातील नागरिकांना देखील याचे श्रेय द्यावी असे व्यक्तव्य करत विरोध दर्शवला. तसेच, राम मंदिराच्या शिलान्यासचा उल्लेख करत यावेळी पंतप्रधान राजीव गांधी असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यात काँग्रेसचे काय योगदान आहे? असा प्रश्न आल्टन यांना केला.

यावेळी विजय सरदेसाई यांनी मध्यस्थी करत आल्टन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. राम मंदिराचा शिलान्यास झाला त्यावेळी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते. मंदिर उघडले यावेळी शरद पवारांनी केलेले वक्तव्य तपासून पाहा, असेही विजय सरदेसाई म्हणाले.

मंदिराची पायाभरणी नाही पण राम मंदिर खुले करण्याच्या प्रक्रियेतील ही मोठी घटना होती असेही सरदेसाई म्हणाले.

दरम्यान, या खासगी प्रस्तावाचे दोन भागात विभागणी करण्यात आली. एकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिनंदन करणारा प्रस्ताव तर, दुसरा सुट्टीचा प्रस्ताव होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहिल्या प्रस्तावासाठी सरकारची अनुमती दर्शवली. मतदानात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT