सभापती रमेश तवडकरांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी क्रीडा आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या विशेष अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या आरोपवरुन राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले असताना, या वादात माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी उडी घेत तवडकरांवर गंभीर आरोप केले.
यावरुन माजी मंत्री प्रकाश वेळीप यांना विधानसभेत बोलवून जाब विचारणार असल्याचे सभापती रमेश तवडकरांनी आज (शुक्रवारी) अधिवेशन दरम्यान सांगितले.
माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. अधिवेशन सुरु असताना आरोप करुन त्यांनी सभापती म्हणून माझ्या विशेषाधिकारांचा अपमान केला आहे. याबाबत त्यांना विधानसभेत बोलवून जाब विचारणार असल्याचे सभापती रमेश तवडकरांनी चालू अधिवेशनात एका निवेदनाद्वारे सांगितले.
तसेच, तवडकरांनी प्रसार माध्यमांना देखील खातरजमा केल्या वृत्त प्रसारित करण्याची सूचना केली.
सभापतिपदी विराजित व्यक्ती आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर कोणतीच शहानिशा न करता आरोप करते, असे आम्ही कधी पाहिले नाही. सभापती रमेश तवडकर काणकोणमध्ये मोठ-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. या कार्यक्रमांचा खर्च कोट्यवधींचा आहे, असे प्रकाश वेळीप म्हणाले होते.
सभापती रमेश तवडकर विविध कार्यक्रम करतात, संस्था चालवतात त्यांना सरकारच्या विविध खात्याद्वारे देण्यात आलेल्या रकमेची चौकशी व्हावी. बलराम उच्च माध्यमीक विद्यालय सरकारद्वारे 43 कोटी देण्यात आले आहेत. लेखक गावकरांची कोणी सतावणूक केली. एसटी विद्यार्थी वसतीगृहाच्या पर्वरीतील प्रकल्प कोण अडवत आहे याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.