Sunburn Festival | Sunburn Festival in Goa | Sunburn Festival 2022 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: सनबर्न फेस्टिव्हलवर कडक लक्ष ठेवा; ड्रग्जमुळे एक जरी मृत्यू झाला तरी राज्य सरकार जबाबदार...

काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यांची मागणी; डिसेंबरअखेरीस गोव्यात महोत्सव

Akshay Nirmale

Sunburn Festival: गोव्यात डिसेंबर अखेरीस होणाऱ्या सनबर्नसारख्या महोत्सवांवर कडक लक्ष ठेवा, अशी मागणी काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी केली आहे. फेस्टिव्हलमध्ये कुणाचाही ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असेही ते म्हणाले. या संदर्भात भंडारी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि संबंधित विभागांना निवेदन दिले आहे.

गोव्यातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महोत्सवांमध्ये ड्रग्जच्या कथित सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा भंडारी यांनी केला. भंडारी यांनी म्हटले आहे की, सनबर्न सारखे ईडीएम उत्सव नेहमीच आपल्या गोव्याचे नाव बदनाम करणारे वाद निर्माण करतात. 2009 मध्ये नेहा बहुगुणा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मरण पावली, 2014 मध्ये मुंबईतील फॅशन डिझायनर ईशा मंत्रीचा अमली पदार्थांच्या अतिसेवनाने ईडीएम उत्सवानंतर मृत्यू झाला आणि 2019 मध्ये साई प्रसाद (32 वर्ष), वेंकट सत्यनारायण (31 वर्ष) आणि संदीप कोट्टा (24 वर्षे) या 3 तरुणांचा मृत्यू झाला,” असे भंडारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

2013 मध्ये, स्थानिक चॅनेल एचसीएनने की सनबर्न ईडीएम आयोजक व्यावसायिक कर आणि इतर कर कसे चुकवतात हे उघड केले आहेत. 2016 मध्ये, सनबर्न ईडीएम महोत्सवाचे आयोजक पुणे-महाराष्ट्र येथे गेले. तेव्हा स्थानिकांच्या तीव्र नाराजीमुळे, सनबर्नला पुण्यातील 3 वर्षांच्या अल्प कालावधीत दोनदा उत्सवाची ठिकाणे बदलणे भाग पडले. सनबर्नच्या आयोजकांना गोव्याप्रमाणेच महसूल जमा करण्यात अपयश आल्याने त्यांनी गोव्यात परत येण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

जेव्हा सनबर्न गोव्यात परतले तेव्हा डिसेंबर 2019 मध्ये 3 तरुणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे अशा ईडीएम उत्सवांबद्दल पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले. 15 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत पर्यटन हंगामाच्या दरम्यान मेगा ईडीएम फेस्टिव्हलला परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय का बदलला असा प्रश्न त्यांनी केला आहे.

हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा गोव्यात अंमली पदार्थाच्या अतीसेवनामुळे मृत्यू झाल्याने आणि इतर प्रकरणांमुळे गोव्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी अशा ईडीएम उत्सवांवर कडक लक्ष ठेवण्याची गरज भंडारी यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT