Jana Bhandari, Asvin chandru Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: सनबर्न म्हणजे फक्त ड्रग्ज सेवन, परवानगी नकोच! काँग्रेस नेते जना भंडारी

Janardhan Bhandari: दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांची भेट घेऊन निवेदन दिले

गोमन्तक डिजिटल टीम

सनबर्न फेस्टिवलचे गोव्यात होणारे आयोजन फक्त ड्रग्ज सेवन करण्यासाठीच असते. त्यामुळे हा संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठीं कुठलीही परवानगी या आयोजकांना देण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन आज काँग्रेस नेते जना भंडारी यांनी मुख्य सचिवांना दिले.

भंडारी हे प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस असून त्यांनी आज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

दरवर्षी वागतोर येथे होणारा हा संगीत महोत्सव यंदा दक्षिण गोव्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली होती. मात्र, त्यामुळे दक्षिण गोव्यातही ड्रग्ज संस्कृती फोफावेल ,असा दावा करून या महोत्सवावर बंदी आणा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT