Congress Leader Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजपच्या जुमला सरकारवर जनतेचा विश्वास नाही; दिगंबर कामतांचे टीकास्त्र

भाजप सरकारने गोव्यातील मच्छीमार व्यावसायिकांना आर्थिक रित्या संकटात टाकल्याचा आरोप देखील कामत यांनी यावेळी केला आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: येणारे सरकार मध्यमवर्गीयाबरोबर गरीब जनतेचे असणार, कारण ते लोकशाहीप्रधान सरकार फक्त काँग्रेस पक्ष देणार. भाजप (BJP) मध्यमवर्गीय गरीबाच्या पोटावर मारणारे सरकार असून जनता त्यांना वैतागलेली असून असल्यास जुमला सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. प्रदूषणकारी प्रकल्प गोव्यात आणून जनतेचे आरोग्य धोक्यात आणण्याचे षड्यंत्र भाजप सरकार करीत आहे. देशात बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने येथून भाजपला हद्दपार करणे आजच्या युवकांच्या हाती असल्याची प्रतिक्रिया गोवा विधानसभेचे विरोधी नेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी दिली.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीत रविवार पर्यावरणप्रेमी तथा समाजसेवक ओलेन्सीओ सिमाईश व माजी सांकवाळचे जिल्हा पंचायत सदस्य, तथा माजी सरपंच वसंत (गोपी) नाईक यांच्या कुठाळी येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेत गोवा प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व माजी मुख्यमंत्री कामत यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. पुढे बोलताना विरोधी पक्षनेते कामत म्हणाले की भाजप सरकारने गोव्यातील मच्छीमार व्यावसायिकांना आर्थिक रित्या संकटात टाकले आहे. राज्यात प्रदूषणकारी प्रकल्प लादून एकाप्रकारे जनतेच्या छळ सुरू केला आहे.

माझ्या कारकिर्दीत गरीब मध्यमवर्गीयांना कोणता त्रास दिला नव्हता, मात्र भाजप सरकारने गरीब मध्यमवर्गीयांना आर्थिकरित्या कमकुवत करून ठेवलेले आहे. कोळश्यामुळे गोवा प्रदूषण होत असून याला पूर्णपणे जबाबदार केंद्र सरकार बरोबर राज्य सरकार असल्याची टीका कामत यांनी केली. टॅक्सी व्यवसाय गोव्यातून नष्ट करण्याचे कारस्थान भाजप सरकार करीत असल्याची माहिती शेवटी विरोधी पक्षनेते कामत यांनी दिली.

कुठ्ठाळी मतदार संघातून काँग्रेस अवश्य यश संपादन करणार आहे. कारण हा मतदारसंघात पूर्वीपासून काँग्रेस जवळ होता. येथूनच काँग्रेस पक्ष आघाडी घेऊन संपूर्ण मुरगाव तालुक्यात काँग्रेस विजयी होणार असल्याची आशा गोवा प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले. गोव्यात दिल्लीतील एका पक्षाने मोफत कडधान्य वाटून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. दिल्लीत सपशेल अपयशी ठरलेला आम आदमी पक्ष गोव्यात राष्ट्रीय स्वयं संघाच्या मदतीने काँग्रेस पक्षाला पाडण्याचे षडयंत्र रचित असल्याची टीका चोडणकर यांनी केली.

कोळसा माफिया विरोधात बोलण्याचे समर्थ नसलेल्या आप पक्षाला येथे येऊन राजकारण करणे शोभत नाही. भाजपकडे काँग्रेस पक्षाला पराभूत करण्याची क्षमता नसल्याने त्यांनी दिल्लीतून आप पक्षाला येथे काँग्रेसची मते फोडण्यासाठी आयात केले असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. केंद्रा बरोबर राज्य सरकार कर्जात बुडाले असून यांना देशातील विमानतळ, रेल्वे, गॅस आस्थापने, जीवन विमा व इतर जे काँग्रेसने सत्तर वर्षात कमवलेले हे भाजप सरकार विकण्याच्या स्थितीत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 28 वरून पाच वर आणण्यासाठी गोवा काँग्रेस समितीने निश्चित केले असून, गोव्यातील जनता भाजप बरोबर नसल्याची माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली.

कुठ्ठाळीचे लोकनेते स्वर्गीय माथानी साल्ढाणा यांनी खऱ्या अर्थाने गोव्याला भाजपचे सरकार आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. पण प्रत्यक्षात या सरकारने मच्छीमार बंधूवर, रापणकार, शेतकरी बरोबर प्रदूषणहित प्रकल्प गोव्यात आणून माथानीच्या आत्म्याला त्रास दिला आहे. कुठ्ठाळीतून ओलेन्सीओ सिमॉईश व दाबोळीतून माजी सरपंच वसंत नाईक यांचे कार्य जनतेच्या हिताचे असल्याने त्यांचे काँग्रेस पक्षात आम्ही स्वागत करीत असल्याची माहिती शेवटी चोडणकर यांनी दिली. यावेळी कामगार नेते अरुण गवळी, माजी पंच कामिलो सोजा, ज्यो डायस, काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, महिला अध्यक्षा बिना नाईक, एलविस गोम्स, राजू काब्राल, यांची भाषणे झाली. या प्रसंगी माजी सरपंच वसंत नाईक व ओलेन्सीओ सिमाईश यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सूत्रसंचालन पावलू सोजा तर सर्वांचे आभार प्रदर्शन गटाध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT