Congress leader Amit Patkar virtual met with youth On occasion of Youth Day Dainik Gomantak
गोवा

Youth Day: काँग्रेसचे नेते अमित पाटकर यांचा युवकांशी व्हर्चुअल संवाद

नेमका कोणता विकास अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा अमित पाटकर यांचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

कुडचडे: कोविडच्या काळात आपल्या प्रचारासाठी वेगळ्या अभिनव वाटा चोखळणारे काँग्रेसचे नेते अमित पाटकर यांनी काल युवा दिनाचे औचित्य साधून कुडचडेतील युवकांशी व्हर्चुअल संवाद साधला.

भाजपने (Goa BJP) मागच्या 10 वर्षात नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन युवकांना झुलवत ठेवले. आता निवडणूक (Assembly Election) तोंडावर आल्यानंतर काही युवकांना नोकऱ्या देण्यातही आल्या मात्र त्या एकतर मंत्र्यांच्या वाशीलाच्या तट्ट्याना मिळाल्या किंवा लाखो रुपयांची लाच देऊन मिळवाव्या लागल्या हा युवकांवर झालेला अन्याय असे पाटकर म्हणाले.(Congress leader Amit Patkar virtual met with youth On occasion of Youth Day)

पाटकर यांनी यापूर्वी मतदारांशी असाच व्हर्चुअल संवाद साधत त्यांना नेमका कुठल्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या उपक्रमाला त्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कालच्या संवादातही त्यांच्याशी बरेच युवक कनेक्ट झाले असे पाटकर यांनी सांगितले. सध्या कोविडचा काळ असल्याने मतदारांच्या सुरक्षेसाठी आपण व्हर्चुअल प्रचारावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना गोव्यात येणारे सरकार हे काँग्रेसचेच असणार हे आता नक्की झाले आहे. काँग्रेस पक्ष (Congress Party) सत्तेवर आल्यावर युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्या बरोबरच त्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देणार असे पाटकर यांनी सांगितले.

भाजप हे युवकांच्या विरोधात काम करणारे सरकार असून या सरकारला धडा हे युवकच शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT