Amit Patkar News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: ''मोपा भाजपची खाजगी मालमत्ता आहे का?'' काँग्रेसने गोवा सरकारला फटकारले

विमानतळ उद्घाटन निमंत्रणावरुन सोडले टिकास्त्र

दैनिक गोमन्तक डिजिटल

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोपा विमानतळाच्या उद्घाटनासाठीचे निमंत्रण विरोधी पक्षनेते आणि दक्षिण गोव्याचे खासदार यांना नसल्याने याचा गोवा काँग्रेसने आता संताप व्यक्त केला आहे. यावरुन आज गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा सरकारचा शेलक्या शब्दात समाचार घेतला, व भाजपला हे विमानतळ म्हणजे आपली खाजगी मालमत्ता वाटते आहे का? असा सवाल केला.

(Congress leader Amit Patkar criticized the Goa government over Mopa airport invitation)

Mopa

मोपा हे गोवा राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. याचे उद्घाटन काही तासांवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते या निमित्ताने गोव्यात येत आहेत. मात्र या उद्घाटनाचे निमंत्रण विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आज गोवा सरकारला चांगलेच फैलावर घेतले.

पाटकर म्हणाले की, ''मोपाच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा उल्लेख भाजने जाणिवपुर्वक टाळला आहे. अशा कार्यक्रमांमध्येही भाजपला राजकारण दिसते आहे. असे असेल तर भाजपला हे विमानतळ म्हणजे आपली खाजगी मालमत्ता वाटले आहे का?'' असा थेट सवाल करत, लोकप्रतिनीधींना निमंत्रण असायलाच हवं अशी भुमिका त्यांनी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: Formula – 4 मुरगावमध्ये होणार; मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT