Traffic Congestion: डिचोलीत बेशिस्त पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी; कडक कारवाईची गरज

Traffic Congestion: डिचोली शहरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहे.
Traffic Congestion
Traffic CongestionDainik Gomantak
Published on
Updated on

Traffic Congestion: डिचोली शहरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून, ''ट्रॅफिक जाम'' होण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. तर दुसऱ्या बाजूने बंदी असूनही बगलमार्गावर अवजड वाहने पार्क करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. शहरातील वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई अधिक कडक करावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.

डिचोली शहरातील ठराविक भागात अधूनमधून वाहतूक कोंडी होत असली, तरी विशेष करून बाजारातील रस्ता आणि सोनारपेठ-पाजवाडा रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. शहरातील कदंब बसस्थानकाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तर वाहतूक कोंडीचे प्रकार सर्रासपणे अनुभवायला मिळतात.

Traffic Congestion
Goa police: धरपकड सुरुच; पेडणेत दोघांच्या मुसक्या आवळल्या; साडे नऊ लाखांचे अमली पदार्थ जप्त

विशेष करून बुधवारी साप्ताहीक बाजाराच्या दिवशी तर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनते. या रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क करून ठेवण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवत असते. मध्यंतरी वाहतूक पोलिस विभागातर्फे बेशिस्त पार्किंग विरोधात दंडात्मक कारवाई हाती घेतल्यानंतर वाहतूक बेशिस्त पार्किंगचे प्रकार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा बेशिस्त पार्किंगच्या समस्येने डोके वर काढले आहे.

बंदी क्षेत्रात पार्किंग

बसस्थानक ते शिवाजी महाराज सर्कल पर्यंतचा बगलमार्ग ''नो पार्किंग'' क्षेत्र म्हणून अधिसूचित केला आहे. या बगलमार्गावर वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे. तरीदेखील या बगलमार्गावर वाहने पार्क करण्याचे प्रकार चालूच आहेत. रात्रीच्यावेळी तर हमखास या बगलमार्गावर अवजड वाहने उभी ठेवलेली आढळून येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com