Amarnath Panjikar Dainik Gomantak
गोवा

आयनॉक्स प्रांगणात लागलेल्या आगीस सावंत सरकारच जबाबदार; अमरनाथ पणजीकरांचा हल्लाबोल

Congress Leader Amarnath Panjikar Criticizes Sawant Government: आयनॉक्स कोर्टयार्डमधील एका मोठ्या मंडपाला आग लागण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पणजीकरांनी लोकांचे जीवन धोक्यात आणल्याबद्दल सावंत सरकारवर सडकून टीका केली.

Manish Jadhav

पणजी: आयनॉक्स कोर्टयार्ड आणि जुने गोमॅको रुग्णालयाची वारसा इमारत परिसरात रविवारी (8 डिसेंबर) लागलेल्या आगीला कारणीभूत वेल्डिंग कामाला परवानगी कशी देण्यात आली? अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर विभागाच्या सर्व परवानग्या आयोजकांनी घेतल्या होत्या का? असा सवाल करत काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकरांनी हल्लाबोल केला. एवढ्यावरच न थांबता पणजीकरांनी थेट मुख्यमंत्र्यांनाही निशाण्यावर घेतले.

दरम्यान, आयनॉक्स कोर्टयार्डमधील एका मोठ्या मंडपाला आग लागण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पणजीकरांनी लोकांचे जीवन धोक्यात आणल्याबद्दल सावंत सरकारवर सडकून टीका केली. वारसा इमारत आणि चार स्क्रिनचे आयनॉक्स चित्रपटगृह यांच्या मधोमध असलेल्या जागेत आयनॉक्सचे सुरक्षा उपव्यवस्थापक सुरज शितोळे यांनी सांगितल्याप्रमाणे आगीला जबाबदार असलेल्या वेल्डिंगच्या कामाला परवानगी कशी मिळाली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असेही पुढे पणजीकर पुढे म्हणाले.

आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जे गृहमंत्री आणि गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष आहेत यांच्याकडे आगीच्या घटनेवर सविस्तर अहवालाची मागणी करतो. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जे कोण हलगर्जीपणा व आगीच्या घटनेस जबाबदार आहेत अशा सर्वांवर तात्काळ कोठरात-कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पणजीकरांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT