Congress and BJP Dainik Gomantak
गोवा

'निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर काँग्रेस जबाबदार'

आपल्या पक्षाच्या हितासाठी लोकांची दिशाभूल

दैनिक गोमन्तक

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी काँग्रेसवर गोव्यातील लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. टीएमसी नेत्याने माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यावर टीका केली आणि सांगितले की पक्षाने आघाडीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला होता, जो नाकारला गेला. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत विजय मिळवला तर काँग्रेस नेत्याची चूक असल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला.

टीएमसी (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, गोवा निवडणुकीचा (election) निकाल भाजपच्या बाजूने गेल्यास काँग्रेस नेत्याने “सार्वजनिकपणे समोर येऊन दोष त्यांच्यावर घ्यावा”. पणजीतील पत्रकार परिषदेत बॅनर्जी यांनी काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला तेव्हा ते बोलत होते.

टीएमसी नेत्याने काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक चिदंबरम (P Chidambaram) यांच्यावर “आपल्या पक्षाच्या हितासाठी लोकांची दिशाभूल केल्याचा” आरोप केला. माजी मंत्र्यावर टीका करताना ते म्हणाले, "पी चिदंबरम, ज्यांच्याबद्दल मला सर्वात जास्त आदर आहे, परंतु ते त्यांच्या पक्षाचे हित साधण्यासाठी ज्या प्रकारे लोकांची दिशाभूल करत आहेत.

टीएमसी नेत्यांनी चिदंबरम यांच्यावर हल्ला चढवला

काँग्रेसवर टीका करण सुरू ठेवत बॅनर्जी म्हणाले की, टीएमसीने भाजपच्या विरोधात एकत्रित युती करण्यासाठी खूप दिरंगाई केलीय. टीएमसी गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनीही काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना फटकारले होते की त्यांच्या पक्षाने गोव्यात (goa) काँग्रेसला सत्ताधारी भाजपविरुद्ध लढण्यासाठी “औपचारिक आणि निश्चित” ऑफर दिली होती. चिदंबरम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोईत्रा म्हणाले की, काँग्रेस नेत्याने अशी विधाने करण्यापूर्वी त्यांच्या पक्षनेतृत्वाशी बोलले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT