Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Goa Congress Dispute:‘व्होट चोरी’ आंदोलनावेळी पाटकर यांनी अपशब्द वापरले. त्याविषयी ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष चौधरी यांनी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाच पानी लेखी तक्रार केली.

Sameer Panditrao

पणजी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याविरुद्ध ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी वरिष्ठांकडे केलेली तक्रार प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचल्याने पक्षांतर्गत अशा गोष्टी बाहेर कशा पोहोचतात, यावरून काँग्रेसमध्ये जोरदार वादळ निर्माण झाले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडे हा सर्व प्रकार मांडणार असल्याची माहिती पाटकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

१४ ऑगस्ट रोजी ‘व्होट चोरी’ आंदोलनावेळी काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी अपशब्द वापरले. त्याविषयी ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष चौधरी यांनी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाच पानी लेखी तक्रार केली.

या तक्रारीची प्रत प्रसारमाध्यमांकडे पोहोचल्याने या वादाची वाच्यता सर्वत्र झाली. परंतु असा काहीच प्रकार घडला नसल्याचे पाटकर यांचे म्हणणे आहे. मी वेगळ्या कारणाविषयी चौधरी यांच्याकडे विचारणा केली होती.

पक्षांतर्गत वाद मिटला, निंबाळकर

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि ‘एनएसयूआय’चे नौशाद चौधरी यांच्यात निर्माण झालेल्या या वादाविषयी गोवा प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याशी ‘गोमन्तक’ने संपर्क साधला असता, मी हा वाद मिटवला असून ही बाब पक्षांतर्गत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माझ्याविरोधात कटकारस्थान : प्रदेशाध्यक्ष

पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटकर यांच्याविरोधात आमदार कार्लुस फेरेरा यांनीही वरिष्ठांकडे तक्रार केली होती. आता ‘एनएसयूआय’नेही तक्रार केल्याने अखेर पाटकर यांनी राष्ट्रीय पक्षाध्यक्षांकडे हा विषय मांडण्याचे ठरविले आहे. याविषयी पाटकर म्हणाले, यापूर्वीही माझ्याविरोधात पक्षात कटकारस्थान चालत असल्याचे उघड झाले होते. पडत्या काळातही मी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले आहे आणि पक्षाची संघटना पुन्हा बांधली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..किनारे वाचवा'! मुंबईच्या विद्यार्थिनीने पार केला गोव्याचा समुद्र; कुठ्ठाळी ते मिरामार पोहून राबवली Swim for Sea मोहीम

Goa Today Live Updates: मोपावरुन नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरु होणार!

'डिचोलीत पर्यटन सर्किट उभे राहिल'! श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण सुरु; CM सावंतांची उपस्थिती

Blackbuck Death: धक्कादायक! 1 नाही 2 नाही... 28 काळविटांचा मृत्यू! राज्यात पहिल्यांदाच असा संसर्ग, वनमंत्र्यांनी दिले कठोर चौकशीचे आदेश

Canacona Water Problem: 8 दिवस पाण्याची टंचाई! ग्रामस्थांनी घातला सहाय्यक अभियंत्याला घेराव; मास्तीमळ येथे पाणीप्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT