Dinesh Gundu Rao Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसचे प्रभारी उद्यापासून गोवा दौऱ्यावर

अशी माहिती गोवा प्रदेश समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख (M. K. Sheikh) यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसचे गोवा (Congress Goa) प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) हे उद्या 4 ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर येत असून या तीन दिवसांच्या आपल्या गोवा भेटीत ते वेगवेगळ्या ठिकाणच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची मते जाणून घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने ते काँग्रेस गट समितीच्या सदस्याबरोबर चर्चा करणार आहेत अशी माहिती गोवा प्रदेश समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख (M. K. Sheikh) यांनी दिली.

5 ऑगस्ट रोजी सकाळी ते सांगेच्या दौऱ्यावर जाणार असून सकाळी 11 वाजता सांगे येथील गुरुकुल सभागृहात त्यांची काँग्रेस गट समितीकडे चर्चा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ते कुडचडेच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटणार असून सायंकाळी 6.30 वाजता बाळ्ळी येथील मल्लिकार्जुन सभागृहात केपेच्या गट कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.

6 रोजी सकाळी 11 वाजता ते श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन सभागृहात काणकोणच्या गट कार्यकर्त्यांना भेटणार असून नंतर सायंकाळी 4 वाजता लोयोला फुर्तादो वाचनालय सभागृहात वेळ्ळी गट समितीच्या तर सायंकाळी 5.30 वाजता कुंकळ्ळी गट समिती कार्यकर्त्यांना मार्डीकट्टा येथील बहुउद्देशी सभागृहात भेटून चर्चा करणार आहेत. यातील केपे, कुंकळ्ळी, वेळ्ळी व काणकोण येथे काँग्रेसचे निवडून आलेले आमदार भाजपात गेल्याने त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी द्यावी यावर अद्याप एकमत होत नसून सांगे येथील अपक्ष आमदार प्रसाद गावकर याना काँग्रेस पक्षात घेण्यास स्थानिक कार्यकर्त्याचा विरोध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT