Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

कॉंग्रेसला पक्षांतरची शपथ द्यावी लागते; यासारखे दुर्दैव नाही: स्मृती इराणी

भाजपचे काणकोणचे उमेदवार रमेश तवडकर यांच्या चावडी येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

दैनिक गोमन्तक

काणकोण: अमेठी मतदारसंघातून निवडणूक हरलेल्या नेत्याला गोव्यात येऊन आपल्या उमेदवारांकडून निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची शपथ द्यावी लागते यासारखे दुर्दैव नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर शरसंधान साधले. भाजपचे काणकोणचे उमेदवार रमेश तवडकर यांच्या चावडी येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी कर्नाटकचे माजी आमदार सुनील हेगडे, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते. इराणी म्हणाल्या, भाजपने कोरोना लस तसेच वीज व लोककल्याणकारी योजनांचा लाभ देताना जात, धर्म यांचा कधीच विचार केला नाही. दरम्यान, स्मृती इराणी यांची चावडीतील नियोजित सभा सायंकाळी 6 वाजता होती. मात्र, त्यांचे आगमन 8 वाजता झाले.

पाणी प्रश्‍नाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न

क्रीडामंत्री म्हणून जेवढ्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, त्या आजपर्यंत झाल्या नाहीत. काणकोणमधील पाण्याचा प्रश्न सोडविल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यमान आमदारांनी मी केलेल्या विकासकामांपैकी दहा टक्केही विकास केलेला नाही, अशी टीका तवडक यांंनी यावेळी केली.

त्यामुळे मोजक्याच शब्दांत त्यांनी आपले म्हणणे मांडले. सभास्थानी निवडणूक अधिकारी आल्यामुळे ही सभा 8 वाजता संपवण्यात आली. तत्पूर्वी भाजपच्या अन्य नेत्यांनी भाषण केले. ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने आम्ही काम केले. ते काम काणकोणमधील जनतेला भावले. त्यामुळेच मोठ्या संख्येने जनतेचा पाठिंबा लाभत असल्याचे रमेश तवडकर यावेळी म्हणाले. कल्याणचे आमदार गणपत कल्याण यांनी, जो माणूस नोकऱ्या देण्यासाठी पैसे घेतो, तो मतदारसंघाचा विकास करू शकत नाही. भाजप कधीच भ्रष्टाचारी नेत्याला उमेदवारी देत नाही, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, श्रीस्थळचे माजी सरपंच दत्ता गावकर, लक्ष्मण पागी, चंदा देसाई, आगोंदचे माजी सरपंच शाबा नाईक गावकर, माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी यांची भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT