Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Yuri Alemao Goa Rakhan Yatra: गोवा क्रांतिदिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने गुरुवारी म्हापसा शहरात ‘जन क्रांती सभे’चे आयोजन केले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: गोवा क्रांतिदिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने गुरुवारी म्हापसा शहरात ‘जन क्रांती सभे’चे आयोजन केले होते. या सभेत बोलताना काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मोठी घोषणा केली. येत्या २२ सप्टेंबर पासून पेडणे ते काणकोण अशी ‘गोवा राखण यात्रा’ आयोजित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजप सरकारच्या हुकूमशाही पद्धतीविरोधात आवाज उठवण्यासाठी, गोव्यात परिवर्तन आणण्यासाठी आणि राज्याला नवीन दिशा देण्यासाठी ही क्रांती यात्रा असेल, असे आलेमाव यांनी सांगितले.

या सभेला काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, आमदार कार्लुस अल्वेस फेरेरा, आमदार आल्टन डिकॉस्टा, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन, ॲड. शशांक नार्वेकर यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘२०१२ पासून भाजपने परिवर्तनाच्या नावाखाली सत्ता मिळवली, पण प्रत्यक्षात जनतेची फसवणूकच केली. गोव्याच्या जमिनी विकून केवळ आपल्या ठराविक भांडवलदार मित्रांना आर्थिक फायदा पोहचवण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप आलेमाव यांनी केला.

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर जाती आणि धर्माचे राजकारण करून समाजात फूट पाडत असल्याचा आरोप केला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे उदाहरण देत त्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरही शंका उपस्थित केली. काँग्रेस पक्षात यापुढे केवळ निष्ठावंतांनाच स्थान दिले जाईल, असे सांगितले.

गोव्याची ओळख पुसण्याचा सरकारचा डाव: गिरीश

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, भाजप सरकार जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यभरात विविध मुद्यांवर आंदोलने सुरू असताना सरकार आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंदवून त्यांना मानसिक त्रास देत आहे. भाजपने सर्व घटनात्मक संस्था संपवून टाकल्या असून जनतेच्या मनात सरकारबद्दल तीव्र संताप आहे. गोव्याची अस्मिता आणि ओळख पुसून टाकण्याचा सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही.

काँग्रेसचा इतिहास कोणीही पुसू शकत नाही : निंबाळकर

डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाजपमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवत सांगितले की, काँग्रेस क्रांती घडवू शकत नाही, असा खोटा संभ्रम विरोधक पसरवत आहेत, परंतु काँग्रेस पक्षाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. काही नेते पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस संपत नाही. आम आदमी पार्टी किंवा तृणमूल काँग्रेससारखे पक्ष केवळ निवडणुका आल्या की गोव्यात सक्रिय होतात. याउलट, काँग्रेस पक्ष सदैव गोव्याच्या आणि येथील जनतेच्या हितासाठीच काम करत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

कारवर 3400 Kiss अन् VIDEO व्हायरल! गर्लफ्रेंडचा 'किसिंग स्टंट' पठ्ठ्याला पडला महागात; पोलिसांनी कार धुवायला लावून ठोठावला 5500 रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT