Goa Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: भाजपच्या पहिल्या यादीत नवख्यांना संधी! मगोसाठी जागा राखीव; काँग्रेस–फॉरवर्ड- आरजीपीचे तळ्यात मळ्यात

Goa Zilla Panchayat Election: भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्‍यात येणार असल्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जिल्‍हा पंचायत निवडणुकीतील भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्‍यात येणार असल्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले होते. त्‍यानुसार, १९ उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली आहे.

जनसंपर्क, जिंकण्‍याची क्षमता, पक्षनिष्‍ठा आणि प्रामाणिकपणा अशा गोष्‍टी केंद्रस्‍थानी ठेवून भाजपने जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड केल्‍याचे आणि ५० पैकी तीन जागा सत्तेत असलेल्‍या मगो पक्षाला दिल्‍याचेही दामू नाईक यांनी नमूद केले.

त्‍यानुसार, पहिल्‍या यादीत बार्देश, तिसवाडी, वाळपई, पर्वरी, डिचोली, साखळी, प्रियोळ, फोंडा, सावर्डे या विधानसभा मतदारसंघांत येणाऱ्या जिल्‍हा पंचायत मतदारसंघांतील उमेदवारांच्‍या नावांची घोषणा भाजपने केली. त्‍यात सिद्धेश नाईक, श्रमेश भोंसले आणि सिद्धार्थ गावस देसाई हे तीन उमेदवार वगळता भाजपने इतर मतदारसंघांत नव्‍या चेहऱ्यांना संधी दिली आहे. याशिवाय सत्तेत सहभागी असलेल्‍या मगो पक्षाला तीन जागा देण्‍याचा निर्णयही भाजपने घेतला आहे.

काँग्रेस–आरजीपीचे तळ्यात–मळ्यात

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांनी जिल्‍हा पंचायत निवडणुकीत युती करण्‍याचा निर्णय घेतला असला, तरी जागा वाटपाबाबत मात्र या तीन पक्षांच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांमध्‍ये अजूनही एकमत झालेले नाही. सद्यस्‍थितीत तीन ते चार मतदारसंघांवरून जागा वाटपाचे घोडे अडले असून, सोमवारच्‍या बैठकीत त्‍यावर अंतिम निर्णय होईल. त्‍यानंतर लगेचच ५० ही मतदारसंघांतील उमेदवारांच्‍या नावांची घोषणा होईल,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

90 हजार मतदारांना वगळणार! SIR साठी गोव्यासह 12 राज्यांना मुदतवाढ; 96.05% मतदारांकडून अर्ज जमा; आयोगाची माहिती

Naquerim Betul: 'शिवरायांचा किल्ला नष्ट होईल, पर्यावरणाची वाट लागेल'! नाकेरी बेतुलवासीयांचा बंदराला ठाम विरोध; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Partgali Math: 550 कोटी राम नामाचा विक्रम! पर्तगाळ मठानुयायांच्या उपक्रमाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्‌’मध्ये नोंद

काळोखाचा फायदा घेऊन चोरटे घुसले ट्रेनमध्ये, TC - प्रवाशांच्या सतर्कतेमुळे फसला डाव; ओखा-एर्नाकुलम जेएन एक्सप्रेसमधील थरार

Goa IIT Project: रिवण, कोडारही गेले! गोव्यात 'आयआयटी'साठी मिळेना जागा; तंत्रशिक्षण खाते जमिनीच्या शोधात

SCROLL FOR NEXT