Santa Cruz Bogus Voters Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

Goa Bogus Voters: प्रदेश काँग्रेसच्या वतीनेही राज्यातील चाळिसही मतदारसंघाच्या मतदारयाद्या तपासणी करणार असल्याचे काल रविवारी जाहीर केले होते.

Sameer Amunekar

पणजी : मतदारसंघातील यादीत बोगस मतदारांची नावे घुसवल्याच्या आरोपांवरून सध्या देशभर रान उठले आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीनेही राज्यातील चाळिसही मतदारसंघाच्या मतदारयाद्या तपासणी करणार असल्याचे काल रविवारी जाहीर केले होते.

सांताक्रुझ काँग्रेसचे गटाध्यक्ष जॉन नझारेथ यांनी तर आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे बोगस मतदारांचा पुरावाच सादर केला. दरम्यान, तक्रार केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे या मतदारसंघात सुमारे तीन हजार मतदार बोगस असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

जॉन नझारेथ आणि एडविन वाझ यांनी आज सकाळी आल्तिनो येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन यासंबंधी विनंती अर्ज सादर केला.

संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा!

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून इंडिया आघाडीचे नेते सोमवारी रस्त्यावर उतरले. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये २५ विरोधी पक्षांचे ३०० हून अधिक खासदार सहभागी झाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला.

मोर्चादरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मत चोरल्याचा आरोप विरोधकांनी केला.या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी मधेच अडवले. दिल्ली पोलिसांकडून या मोर्चाला पूर्वपरवानगी देण्यात आली नव्हती. 

मोर्चा थांबवल्यानंतर काही अंतरावरच खासदारांनी ठिय्या देऊन आंदोलन सुरू केले. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT