भ्रष्टाचार आरोपातील तथ्यमुळे भाजप गप्प Dainik Gomantak
गोवा

भ्रष्टाचार आरोपातील तथ्यामुळे भाजप गप्प

काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांची टीका

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड काळात (Covid-19) झालेल्या भ्रष्टाचाराचा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री तसेच भाजप (BJP) सरकारवर आरोप करूनही राज्य सरकार त्याविरुद्ध न्यायालयात गेले नाही वा केंद्र सरकारने त्यांना पदावरून हटविले नाही. यावरून त्या आरोपात तथ्य आहे. हे सरकार फुटीरांचे असून भाजप या फुटीरांना प्रोत्साहन देत असल्याची टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी केली.

पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चिदंबरम म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप करूनही हे भाजप सरकार गप्प आहे. त्यामुळे त्यांनी जे आरोप केले आहेत हे त्यांना मान्य आहेत असाच त्याचा अर्थ होतो. केंद्रातील सरकारनेच या सत्यपाल मलिक यांची गोव्यात राज्यपालपदी नियुक्ती केली होती. राज्यपाल त्यांचेच असताना असे आरोप होऊनही त्याबाबत केंद्र किंवा राज्यातील भाजप सरकारकडून कोणतीच स्पष्टीकरण करण्यात आलेले नाहीत. भ्रष्टाचाराचे आणखी सांगाडे बाहेर येऊ नयेत या भितीनेच केंद्र व राज्य सरकारने गप्प राहणे पसंत केले आहे अशी टीका त्यांनी केली.

राज्यातील रस्त्यांवरील खड्डे १ नोव्हेंबरपूर्वी बुजविण्यात सरकारला अपयश आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आश्‍वासन पूर्ण करू शकले नाही. खड्डे वेळेत न बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे उत्तर त्यांनी दिले होते तर त्यांनी काय कारवाई केली. मागील विधानसभेत झुआरी पुलाखालील रस्त्यांची डागडुजी जो कंत्राटदार महामार्गाचे काम करत आहे तो पूर्ण करील असे आश्‍वासन दिले होते त्याचीही अजून पूर्तता केली नाही. त्यामुळे वाहन या रस्त्यावर वाहनांचा दरदिवशी रांगा लागत आहेत, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी गोव्याचा थायलंडशी तुलना करू नये. ते थायलंडला गेले नसल्यास त्यांनी पर्यटनमंत्र्यांना बरोबर घेऊन जावे. त्यांनी बोलताना आपल्या भाषेत सुधारणा करण्याची गरज आहे. पर्यटनसाठी गोवा हा दुसरा पर्याय असे म्हणण्याऐवजी त्यांनी आधी थायलंडला जाऊन यावे व त्यानंतरच गोव्याबाबत वक्तव्य करावे असा टोला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी हाणला.

काँग्रेसचे दोन आमदार भाजपबरोबर आहेत असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते त्यावर विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, त्यांनी राज्याला सुप्रशासन व समस्या सोडविण्याकडे अधिक लक्ष द्यावे. काँग्रेसकडे किती आमदार उरले आहेत याबाबत लुडबूड करू नये. ते लोकांच्या प्रश्‍नांना उत्तरे का देऊ शकत नाहीत. राज्यपालांनी भ्रष्टाचाराचे थेट आरोप करूनही ते गप्प का आहेत असा प्रश्‍न त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT