BJP-Congress  Dainik Gomantak
गोवा

Congress: काँग्रेस पक्षातील ‘तो’ फुटीर गट अजूनही पक्षांतरासाठी सक्रिय

काँग्रेसमधील अस्वस्थता कायम असून फुटीर गट भाजपात जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काँग्रेसमधील (Congress) फुटीर गट अजूनही सक्रिय असून त्यांनी आपल्या हालचाली शांतपणे सुरू ठेवल्या आहेत त्यामुळे अजूनही पक्षातील अस्वस्थता कायम आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये काही पुन्हा एकदा पक्षांतराचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची खात्रीलायक माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा अधिवेशनापूर्वी पक्षाचे आठ आमदार फुटून भाजपात (BJP) जाण्याच्या तयारीत होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचा बेत फसल्याने मोहीम फत्ते झाली नाही. त्यात आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी अधिक दक्ष झाली आहे. त्यामुळे सध्या हालचाली शांतपणे सुरू ठेवण्याचा निर्णय या गटाने केल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेस विधिमंडळ गट नेतेपदावर कॅडरच्या व्यक्तीची निवड व्हायला हवी असे मत पक्षाच्या कॅडरकडून व्यक्त केले जात आहे. सध्या पक्षाच्या कॅडरचे संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) असून त्यांच्या नावाची निवड झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे, परंतु पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचे झुकते माप हे ॲड. कार्लुस फेरेरा यांच्याकडे असल्याने त्यांची निवड होऊ शकते. मात्र, तसे झाल्यास आमोणकर आणि कॅडर दोन्ही नाराज होण्याची शक्यता असल्याने पक्षापुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

पाच आमदारांच्या गटात ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक आणि राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे. गटाचे नेतृत्व कामत आणि लोबो करत असून आणखी काही आमदार त्यांच्या गळाला लागण्याची वाट ते पाहात आहेत. पक्षाने दोघांच्या विरोधात सभापतींकडे अपात्रता याचिका दाखल केली आहे. मायकल यांची काँग्रेस विधिमंडळ गट नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे हा गट सध्या शांत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

SCROLL FOR NEXT