Congress  Dainik Gomantak
गोवा

मयेत काँग्रेस असंतुष्टांनी स्थापन केले 'मये प्रोग्रेसिव्ह फ्रंट'

मयेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या कार्यकर्त्यांनी आता वेगळी 'चूल' मांडली

दैनिक गोमन्तक

डिचोली: मयेची जागा युतीच्या गोवा फॉरवर्डला सोडण्यात आल्याने नाराज झालेल्या आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या कार्यकर्त्यांनी आता वेगळी 'चूल' मांडली आहे. या असंतुष्ट कार्यकर्त्यांनी 'मये प्रोग्रेसिव्ह फ्रंट'ची स्थापना केली असून, मयेतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयारी केलेले आणि युतीमुळे संधी हुकलेले ॲड. अजय प्रभूगावकर यांना निवडणुकीत उतरविण्याचे या फ्रंटने ठरवले आहे. (Mayem Congress Latest News)

सोमवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या गटाचे नेते तथा पिळगावचे माजी सरपंच दिलीप गावस यांनी याबाबत घोषणा केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच हा निर्णय घेतल्याचेही गावस यांनी सांगितले. यावेळी पिळगावचे माजी सरपंच बाबाजी प्रभूगावकर, राजेश गावकर, विनोद धुरी, अजय नाईक, जान्हवी धुरी, फर्जना हरिजन, उज्वला प्रभूगावकर, रूपा हरिजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मयेतून अपक्ष म्हणून निवडणूक (Election) लढविण्यासाठी ॲड. अजय प्रभूगावकर यांना मये सिटीझन्स प्रोग्रेसिव्ह फ्रंटतर्फे प्रस्ताव देण्यात येणार असून, ते निवडणूक लढविण्यास तयार होतील, अशी आशा विनोद धुरी आणि अजय नाईक यांनी व्यक्त केली.

मये गट काँग्रेसमध्ये फूट

ॲड. अजय प्रभूगावकर यांनी मयेत (Mayem) काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पक्षश्रेष्ठींनीही त्यांना पसंती दिली होती. मात्र मयेची जागा युतीच्या गोवा फॉरवर्डला सोडण्यात आल्याने त्यावर नाराजी व्यक्त करून, काँग्रेसचे जिल्हा समिती सदस्य दिलीप गावस, राजेश गावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT