Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Mapusa Market: आधी सुविधा द्या, मग भाडे वाढवा!

Mapusa Market: काँग्रेस : म्हापसा मार्केटमध्ये मूलभूत सोयी पुरवण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Mapusa Market: म्हापसा येथील मार्केटमधील दुकानांची भाडेवाढ करण्याचा निर्णय म्हापसा पालिका मंडळाने घेतला असला तरी, याची अंमलबजावणी करण्यापूर्वी आधी बाजारपेठेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, गटारे व रस्ते करावेत.

त्यानंतरच ठरावाची पूर्तता करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे म्हापसा काँग्रेस गटाध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर यांनी केली.

मंगळवारी सकाळी मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे सरचिटणीस विजय भिके, नगरसेवक सुधीर कांदोळकर, चंदन मांद्रेकर, मिताली गडेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

म्हापसा पालिका बाजारपेठेत डिसिल्टिंग व कचरा उचल व्यतिरिक्त काहीच मूलभूत सुविधा व्यापारी वर्ग किंवा स्थानिकांना देत नाही. फक्त पायाभरणीच्या नावाने इव्हेंट करते आणि जुनी नावांची पाटी काढून आपल्या नावांची नवी पाटी बसवते, अशी टीका नार्वेकरांनी केली.

सुधीर कांदोळकर म्हणाले की, पालिकेत शौचालयांचा अभाव असून स्थानिक आमदारांनी शहरातील मलनिस्सारण प्रकल्प चालीस लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

बाजारपेठेमधील पाण्याची पातळी उच्च असल्याने त्याचा निचरा होत नाही. परिणामी बाजारातील सांडपाणी गटारात सोडले जाते. ते पुढे तार नदीत मिसळते. त्यातून प्रदूषण होते. शिवाय मार्केटमधील पार्किंगचा विषयही रखडला आहे. पालिकेने दुकानांचे वर्गीकरण करावे. नंतरच भाडेवाढीबाबत निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

नगराध्यक्षांनी रेटला ठराव

अ‍ॅड. नार्वेकर म्हणाले की, पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत दुकान भाडेवाढीचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता. महसूल गरजेचा आहे. परंतु पालिकेने त्या बदल्यात व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक. पालिकेने मागील सर्वसाधारण बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेतला. हा आर्थिक विषय असल्याने बैठकीच्या अजेंड्यावर आणणे आवश्यक होता. परंतु, नगराध्यक्षांनी तो गडबडीत मंजूर करून घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT