पणजी: कारापूर-सर्वण येथील हल्लाप्रकरणी सर्व दोषींना त्वरित अटक करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समिती शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे केली. त्याचबरोबर राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजपचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही केला.
काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले. शुक्रवारी पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुनील कवठणकर, माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, जिल्हाध्यक्ष मंगलदास नाईक आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.
पोलिस महासंचालकांशी झालेल्या चर्चेदरम्यान, शिष्टमंडळाने कारापूर-सर्वण येथील हिंसक घटनेची निष्पक्ष, तटस्थ आणि ठराविक कालमर्यादेत चौकशी करण्याची मागणी केली. केवळ गुन्हा नोंदवणे पुरेसे नाही. या घटनेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रह धरला.
पोलिस यंत्रणेवर जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करणे, गौरेश घाडीला न्याय मिळवून देणे आणि पुढील हिंसाचार रोखणे, या गोष्टींना गोवा पोलिस आणि राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असेही या नेत्यांनी नमूद केले.
‘कायदा हातात घेण्याचा प्रकार निंदनीय’
राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि अस्वस्थता निर्माण करत आहे, असे सांगत शिष्टमंडळातील नेत्यांनी घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटना आणि नागरिकांकडून स्वतःच्या हातात कायदा घेण्याचा प्रकार निंदनीय असून हा प्रकार म्हणजे पोलिस आणि प्रशासनावरील जनतेचा विश्वास उडाल्याचे निदर्शक असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.