Dinesh Gundu Rao Dainik Gomantak
गोवा

केंद्राकडून लोकांची दिशाभूल; काँग्रेसची घणाघाती टीका

राज्यात पक्ष मजबुतीसाठी नवसंकल्प शिबिरात दिनेश गुंडू राव यांचा निशाणा

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेसच्या केंद्रीय राष्ट्रीय कार्यकारिणीचे चिंतन शिबिर उदयपूर येथे झाल्यानंतर पणजीत गोवा काँग्रेस पक्षाचे दोन दिवशीय नवसंकल्प शिबिर सुरू झाले. या शिबिरात राज्यात पक्षबांधणी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. गेल्या ८ वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने लोकांची केलेली दिशाभूल यावर चर्चा करून ती लोकांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली.

पणजीतील पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर युवा प्रदेश अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, महिला मोर्चाच्या अध्यक्ष बीना नाईक, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी उपस्थित होते. या दोन दिवशीय नवसंकल्प शिबिरात उद्यापर्यंत पक्षहिताचे विविध निर्णय घेण्यात येणार आहेत असे राव यांनी सांगितले.

यावेळी राव म्हणाले की, या नवसंकल्प शिबिरात राज्यातील आर्थिक, सामाजिक क्षेत्रात सरकारला आलेले अपयश यावर पक्षाच्या नेत्यांनी विचार मांडले. लोकांना अच्छे दिन व रोजगाराचे भाजप सरकारने दिलेले आश्‍वासन गेल्या ८ वर्षांत पूर्ण करू शकलेले नाहीत. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे आमिष दाखवून ते लोकांची लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप सरकारची अपयशाची भूमिका लोकांपर्यंत पोहचवण्यावर भर देतील.

येत्या काही महिन्यांत भाजपच्या आमदारांची संख्या ३० वर पोहचेल, असे वक्तव्य भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केले होते. मात्र, यात काहीच तथ्य नाही. अशी वक्तव्ये राजकारणात होत असतात. काँग्रेसच्या आमदारांवर माझा विश्‍वास आहे, की ते पक्षासोबत राहतील. त्यांचे ते विधान पक्ष गंभीरपणे घेत नाही. आजच्या नवसंकल्प शिबिरात १-२ आमदार वगळता सर्वजण सहभागी झाले होते. त्यांनी पक्षाशी वचनबद्धता दाखवून दिली आहे, असे राव यावेळी म्हणाले.

राज्य सरकारला पंचायत निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत. त्यामुळेच त्यांनी ओबीसी सर्वेचे कारण पुढे करून ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी आयोगामार्फत सर्वे करून ही निवडणूक घेता आली असती. राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. येत्या अधिवेशनात सरकारविरोधात राज्याचे अनेक विषय मांडले जाणार असून त्याची तयारी सुरू आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी भाजप ‘ईडी’चा गैरवापर करत आहे. ‘ईडी’ हे भाजपचे मांडलिक झाले आहे, अशी टीका राव यांनी केली.

पक्ष बळकटीसाठी काँग्रेसचा कार्यक्रम

  • पक्ष सक्षमीकरणासाठी 90 दिवसांमध्ये गट व बूथ समित्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक बूथला भेट दिली जाईल. बूथ व गट यांच्यात समन्वय साधण्यासाठी मंडळ समिती स्थापन करण्यात येईल.

  • आर्थिक माहिती असलेल्यांची राजकीय व्यवहार समित्याही नियुक्त केल्या जाणार आहेत.

  • देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 9 ते 15 ऑगस्टपर्यंत उत्तर व दक्षिण गोवा जिल्ह्यात पदयात्रा काढण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात 75 किलोमीटर अंतर पायी चालण्याचे लक्ष्य.

  • 15 ऑगस्टला या दोन्ही यात्रा एकत्रित भेटून स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT