Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

'मोपा आणि मये आंदोलनप्रकरणी सरकार असंवेदनशील'

काँग्रेसची टीका, आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील रस्त्यांची डागडुजी, जनतेला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र मूलभूत मागण्यांसाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याची पाळी आणली आहे. भाजप सरकार हे असंवेदनशील असल्याची टीका कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली. काळजीवाहू सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत मोपा येथील कामगारांना त्यांचे प्रलंबित वेतन तसेच मये शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करावी, असेही ते म्हणाले.

मये (Mayem) येथे काल बुधवारी आंदोलनकर्त्याना झालेली अटक तसेच मोपा येथे कामगारांनी केलेल्या आंदोलनाचा आमदार आलेमाव यांनी निषेध केला. रस्त्यांची डागडुजी आणि अखंडित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मयेच्या सरपंच, रहिवाशी, एका छाया पत्रकार यांना झालेली अटक दुर्देवी असून मुख्यमंत्र्यांनी त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणीही काँग्रेसच्या (Congress) युरी आवेमाव यांनी केली.

असंवेदनशील आणि काळजीवाहू भाजप सरकारचा जनतेप्रती निष्काळजीपणा चालूच असून, कष्टकरी मोपा विमानतळ (Mopa Airport) बांधकाम कामगारांना पगार न देता उग्र आंदोलन करण्यास भाग पाडले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि सर्व कामगारांचा पगार त्वरित देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे. कॉंग्रेसचे बहुसंख्य आमदार हे तरुण असून, आम्ही सर्वजण संघटितपणे गोमंतकीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यतत्पर राहणार आहोत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT