Amit Patkar dainik gomantak
गोवा

निवडणुकीनंतर गोवा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल; अमित पाटकर गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

मायकेल लोबो विधिमंडळ पक्षाचे नेते तर अमित पाटकर गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमन्तक

पणजी : देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकींचा निकाल लागला असून भाजपने चार राज्यात तर आप ने पंजाबमध्ये सत्ता काबीज केली आहे. मात्र देशातील सर्वात जुन्या पक्षाला सत्ता खेचून आणता आलेली नाही. यावरून काँग्रेस या पाचही राज्यात संघटनात्मक बदल करण्याचे ठरवले होते. त्याप्रकारे इतर राज्यात तसे बदल केले जात आहेत. तसाच बदल गोव्यात ही झाला असून गोवा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. (Congress appoints Amit Patkar as the President of Goa Pradesh Congress Committee)

काँग्रेसने गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अमित पाटकर आणि कार्लोस फरेरा यांची यांची 'मुख्य व्हिप' म्हणून नियुक्ती झाली आहे. तर मायकेल लोबो यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस (Congress) कार्यकारिणीचे स्थायी निमंत्रित सदस्य केले.

दरम्यान गोवा काँग्रेसमध्ये करण्यात आलेले हे बदल गोव्याच्या राजकारणात (Politics) आणि गोवा (Goa) काँग्रेसमध्ये कोणते परिणाम करतात हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT