Goa Assembly Election 2027 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

Congress Goa Assembly Election Alliance: आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष इतर विरोधी पक्षांना बरोबर घेऊन लढणार की त्‍यांचे ‘एकला चलो’ हे धाेरण असणार.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष इतर विरोधी पक्षांना बरोबर घेऊन लढणार की त्‍यांचे ‘एकला चलो’ हे धाेरण असणार, याबाबत अजूनही स्‍पष्‍टता नसून काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्‍लिकार्जुन खर्गे यांच्‍या बैठकीनंतर त्‍यात स्‍पष्‍टता येईल अशी अपेक्षा होती. मात्र, या कळीच्‍या मुद्यावर खर्गे यांनी फारसे न बोलता युतीचा निर्णय स्‍थानिक पातळीवरच घेतला जाईल, असे मोघमपणे सांगितले. आम्ही एकत्र लढू आणि एकत्रितपणे जिंकू, असा नारा त्यांनी यावेळी दिला.

वेर्णा येथे झालेल्‍या बैठकीत सोमवारी खर्गे यांनी युती करून निवडणूक लढविण्‍याबद्दल एक चकार शब्दही उच्‍चारला नव्‍हता. मंगळवारी कासावली येथे काँग्रेसच्‍या राजकीय व्‍यवहार समितीची बैठक खर्गे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. या बैठकीत प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर आणि अन्‍य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्‍थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्‍यमांशी बोलताना, गोव्यात इतर विरोधी पक्षाना बरोबर घेऊन निवडणूक लढवावी या धोरणावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. मात्र, निवडणूक युतीबाबतचे निर्णय आधी राज्यस्तरीय नेतृत्वाकडून घेतले जातील. त्यानंतर प्रस्तावित युती मंजुरीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली जाईल, असे खर्गे यांनी स्‍पष्‍ट केले.

बैठकीबद्दल बोलताना खर्गे यांनी सांगितले की, काँग्रेसची बैठक यशस्वी झाली असून, सर्व नेते एकजुटीने एकत्र आले आहेत. बैठकीत एवढी मोठी गर्दी पाहणे उत्साहवर्धक आहे. सरकार लोकांना घाबरविण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच लोकशाहीत सरकारने शासनाचे नियम पाळले पाहिजेत आणि विरोधी पक्षांशी वैर निर्माण करण्याऐवजी त्यात सुधारणा करण्यासाठी काम केले पाहिजे.

‘जेन झी’ला प्रतिनिधित्व

काँग्रेस पक्ष ‘जेन झी’ला प्रतिनिधित्व आणि निवडणुकीत तिकिटे देण्याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपले सर्वोकृष्ट प्रयत्न करेल. ही आश्वासने पूर्ण केली जातील याची खात्री करण्यासाठी पक्ष इतर पक्षांनाही विश्वासात घेऊन काम करेल, असे खर्गे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT