Congress on Exam Paper Leak Dainik Gomantak
गोवा

Congress on Exam Paper Leak: 10 वर्षांत 152 पेपरफुटीचे प्रकार, आरोपींना भाजपचे अभय; चोडणकरांची जोरदार टीका

Congress alleges paper leak cases: भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत देशभरात विविध स्पर्धा व भरती परीक्षांच्या एकूण १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, या प्रकरणांतील आरोपींना भाजपकडून अभय मिळाले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकरांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत देशभरात विविध स्पर्धा व भरती परीक्षांच्या एकूण १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, या प्रकरणांतील आरोपींना भाजपकडून अभय मिळाले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकरांनी केला.

गिरीश चोडणकर म्हणाले, या प्रकरणांतील एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही. पेपरफुटीच्या घटनांमुळे आतापर्यंत २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्याला नैतिकदृष्ट्या केंद्र सरकार जबाबदार आहे.

काँग्रेस भवनात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या माध्यम व संवाद विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक तसेच एनएसयूआयचे राज्य सरचिटणीस कुमार गवळी उपस्थित होते.

चोडणकर यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना सांगितले की, प्रश्नपत्रिका फुटींचा गंभीर प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून कायम असून, देशभरातील लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली शिक्षण घेत आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा प्रश्न सातत्याने देशासमोर मांडत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उत्तराखंडमधील डेहराडून येथे राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात परीक्षा व्यवस्थेतील अनेक त्रुटी आणि दोष समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असून, त्यांच्या राजीनाम्याची देशभरातून मागणी होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारला कोणतीही संवेदनशीलता नसल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकाराकडे भाजप सरकार गांभिर्याने पाहताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. सरकारने अशी जबादारी टाळणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT