Goa: पत्रादेवी चेकनाका Dainik Gomantak
गोवा

पत्रादेवी चेकपोस्ट वरचा सावळा गोंधळ रेव्होलूशनरी गोवन्सकडून उघड

पत्रादेवी चेकपोस्टवरून महाराष्ट्रातील लोक बिनधास्तपणे गोव्यात येत आहेत. मुख्य गेटवर चाचणीचे नाटक करून लोकांना मूर्ख बनवणे चालू आहे असा आरोप आरजीकडून करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

मोरजी : पत्रादेवी सीमेवर चेकपोस्टचे गेट कोविड चाचणीसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र आरोंदा, सातार्डा आणि पत्रादेवी ते बांदा मार्केट रस्ता खुला आहे. इथून महाराष्ट्र मधून लोक बिनधास्तपणे गोव्यात येत आहेत. मुख्य गेटवर चाचणीचे नाटक करून लोकांना मूर्ख बनवणे चालू आहे असा आरोप आरजीकडून करण्यात आला. काल आरजीच्या मांद्रे गटाने येथे भेट दिली असता तेथील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली.

शाळेतील कर्मचाऱ्यांची चेकपोस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक शाळांचे कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षक या कामासाठी नियुक्त केल्याने शाळेच्या कामात अडचणी येत आहेत. आता काही JE देखील तेथे नियुक्तीवर आहेत परंतु चेकपोस्टवर कर्मचार्‍यांसाठी योग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्याच कार्यालयात 2 कोविड चाचणी प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. मेटल शीटच्या शेड्समध्ये हे कर्मचारी आपले काम करत आहेत. 25 ते 30 चौरस मीटर एवढ्या सावलीत दोन प्रयोगशाळा आणि कार्यालय सुरू आहे. इतक्या छोट्या जागेत कर्मचारी सुरक्षित अंतर कसे राखतील याची आपण कल्पना करू शकत नाही. अशी माहिती सुनयना गावडे यांनी दिली.

"या सावलीत एकावेळी 12 ते 15 कर्मचारी एकत्र काम करत आहेत. तसेच आम्हाला मिळालेल्या माहिती प्रमाणे एक्झिक्युटिव्ह मेजिस्ट्रेट ला वाहन सेवा देखील बंद केली आहे. जणू कोविड योद्धा म्हणून हे विशेष कर्तव्य बजावणार्‍यांना सरकारने हा दंड ठोठावला आहे. त्यासाठी त्यांना भत्ता देखील मिळत नाही. त्यांना स्वतःहून प्रवास करावा लागतो. पदरचे 500-700 रुपये खर्च करून ही ड्युटी करावी लागते", असे मांद्रे आर जीच्या नेत्या सुनयना गावडे यांनी सांगितले.

प्रथम त्यांना चांगल्या सुविधा द्या आणि नंतर त्यांच्या कामाचे श्रेय घ्या. सरकारने कोविड चाचणी प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांसाठी वाहन सुविधा आणि बसण्याची योग्य जागा तात्काळ द्यावी अशी मागणी गावडे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Express: प्रवास घाईचा नाही, तर 'चवीचा'! मुंबई-गोवादरम्यान धावणारी फूड क्वीन 'मांडवी एक्सप्रेस'; खवय्यांसाठी का आहे स्वर्ग?

Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

Chimbel Unity Mall: चिंबल प्रकल्पांवरुन पेच कायम! 'प्रशासन स्तंभ' रद्द करण्याचे संकेत, मात्र 'युनिटी मॉल'बाबत मुख्यमंत्री ठाम

High Court: "सनातन संपवण्याची भाषा म्हणजे नरसंहाराला चिथावणी" निवडणूक वर्षात उदयनिधि स्टालिन यांना हायकोर्टाकडून चपराक!

"मुक्या प्राण्यांच्या जिवाची इतकीच किंमत का?" मर्सिडीजनं कुत्र्याला चिरडलं, कोर्टानं केली 150 रुपयांत सुटका! प्राणीप्रेमींचा संताप

SCROLL FOR NEXT