Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: उमेदवार काही ठरेना! निवड प्रक्रियेत नामुष्‍की; 'या गोंधळाला पक्षनेतृत्‍वच जबाबदार' - कार्यकर्ते आक्रमक

Goa Congress Lok Sabha Election: गिरीश चोडणकर यांनी स्‍वत:च प्रचार सुरू केल्‍याने कार्यकर्त्यांत संभ्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Lok Sabha Election: काँग्रेस पक्ष गोव्‍यातील दोन्‍ही जागांवर उमेदवारांची निवड करू शकला नसल्‍याने कार्यकर्त्यांमध्‍ये संभ्रम निर्माण झाला आहे.

समाजमाध्‍यमांनी विरोधी पक्षांवर नामुष्‍की आणणारी टीका केली आहे. काँग्रेस पक्षाच्‍याच अनेक कार्यकर्त्यांनी गोंधळाबद्दल पक्षनेतृत्‍वाला जबाबदार धरले आहे. सावियो कुतिन्‍हो यांनी तर थेट राहुल गांधींना पत्र लिहिले आहे.

भाजपने आपले दोन्‍ही उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. नियमानुसार प्रचाराची सुरूवात झाली नसली तरी या पक्षाचे दोन्‍ही उमेदवार श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपे यांनी प्रचाराचा नारळ फोडून ठिकठिकाणच्‍या देवस्‍थानांना भेटी देण्‍याचा सपाटा लावला आहे. अनेक भागांत त्‍यांचे दौरेही सुरू झाले आहेत.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी थेट पक्षश्रेष्‍ठींशी संपर्क साधून गोव्‍यात प्रचाराला सुरूवात केल्‍याचे सूत्रांचे म्‍हणणे आहे.

दुसऱ्या बाजूला प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गिरीशना विरोध केला आहे. दक्षिणेत ख्रिस्‍ती उमेदवार असावा असा त्‍यांचा आग्रह आहे.

उत्तर गोव्‍यात रमाकांत खलप यांच्‍याबद्दल आग्रह असूनही त्‍यांचे नाव पक्षाला जाहीर करता आलेले नाही. राजकीय निरीक्षकांच्‍या मते काँग्रेस पक्षाची ही बेपर्वाई व गोंधळ या निवडणुकीत त्‍यांना मारक ठरू शकतो

पसंतीचे उमेदवार निवडा : गोवा फॉरवर्ड

काँग्रेस पक्षाला अद्याप आपले उमेदवार निश्‍चित करता आले नसले तरी भाजपने प्रचारात स्‍पष्‍ट आघाडी घेतल्‍याचे दिसते. भाजपकडे कार्यकर्त्यांचे पायदळ आहेच शिवाय प्रचारासाठी लागणारे धनसुद्धा आहे.

दुसरीकडे काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून मोठे मतभेद निर्माण झाले आहेत. गोवा फॉरवर्डने तर उमेदवार आपल्‍या पसंतीचे निवडावेत म्‍हणून हट्टच धरला. त्‍यामुळे सुरूवातीला विलंब लागला व सध्‍या उमेदवार निवडीवरून पक्षातील नेत्‍यांमध्‍येच मतभेद निर्माण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बिहारमध्ये NDA आघाडीवर, मैथिली ठाकूर पिछाडीवर

IFFI 2025: 'गोव्यातील स्थानिक चित्रपटकर्मींना 'फायदा झाला तर फार चांगले', थोरा-मोठ्यांच्या नजरेतून - इफ्फी

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये पुन्हा NDA? नितीशकुमार यांची जादू कायम; RJD-काँग्रेस आघाडी पिछाडीवर

अग्रलेख: लोक पुढे येऊन आपणच मंत्री-अधिकाऱ्यांना 'पैसे' दिले असे सांगतात, तेव्हा सरकारच्या अब्रूचे 'धिंडवडे' निघतात..

Birsa Munda Jayanti: काणकोणनगरी दुमदुमली! भगवान बिरसा मुंडा शोभायात्रेचा समारोप; 4000 महिलांचा सहभाग

SCROLL FOR NEXT