Goa Easter 2024: राज्यात ईस्टर साजरा; मुख्यमंत्री, राज्यपालांकडून ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा

Goa Easter 2024: या दिवशी, आपण इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची आणि इतरांना सक्षम करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याची शपथ घेतली जाते.
Jesus christ
Jesus christDainik Gomantak

Goa Easter 2024: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना, विशेषत: ख्रिश्चन बांधवांना दिव्य प्रसंगी ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना, विशेषतः ख्रिश्चन बांधवांना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात “ईस्टर म्हणजे प्रेम आणि आनंद वाटून घेण्याची वेळ आहे. सध्याच्या काळात, येशूंचे उदात्त सद्गुण आणि मूल्ये आपल्याला अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी शक्ती देतात त्याचबरोबर मानवी मुल्यांना प्रोत्साहन देतो.

इस्टर सद्सद्विवेकबुद्धीला बळ देण्याचे आणि आजच्या जीवनात आपण इतरांसाठी काय करू शकतो याचे स्मरण करून देतो. या दिवशी, आपण इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची आणि इतरांना सक्षम करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याची शपथ घेतली जाते.

मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देताना म्हटले कि, गोव्याच्या या सुंदर राज्यात राहून आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवा समाज निर्माण करूया. ईस्टरचा सण आशेने आणि सहानुभूतीने आपली मने उजळून टाको आणि सलोख्याच्या भावनेने दुर्बल आणि वंचितांची सेवा करण्यात आनंद मिळविण्यास प्रवृत्त करो.

Jesus christ
Happy Easter 2023 : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा:-

गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना, विशेषतः ख्रिश्चन बांधवांना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टरचा दिवस येशूच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी पुनरुत्थानाचा दिवस आहे. ईस्टर म्हणजे मृत्यू, अंधार आणि वाईट शक्तींवर विजयाचे दैवी प्रतीक आहे.

येशू ख्रिस्तानी प्रेम, करुणा, बंधुता, जबाबदारी आणि क्षमा या शाश्वत मूल्यांचा उपदेश केला. सध्याचे जग, अनेक मानवनिर्मित दुष्कर्मांनी ग्रासलेले आहे येशू ख्रिस्ताचा संदेश आपल्याला बदलण्यास मदत करतो आणि अधिक अर्थपूर्ण, शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करूतो.

या पवित्र प्रसंगी, आपण सर्वांनी इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची आणि शांतता आणि सलोखा टिकवून ठेवण्याची शपथ घेऊया.

या वर्षीचा ईस्टर सण सर्वांना पापावर विजय मिळविण्यासाठी आणि सर्वांमध्ये अधिक शांती, समृद्धी, आनंद आणि एकता आणण्यासाठी प्रेरणा देवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com