Navdurga Temple Madkai Goa Dainik Gomantak
गोवा

Navdurga Temple Conflict: "मूर्तीवर कुणा एकाचा हक्क नाही!" मंदिराचा वाद शिगेला; पुजारी आणि ग्रामास्थ आमनेसामने

Navdurga Temple Madkai Goa: मंदिराच्या पुजाऱ्यांनी एक पत्रकार परिषद भरवली आणि यामध्ये गौरव घैसास यांच्यासोबत मंदिराचे मुख्य पुरोहित प्रशांत घैसास आणि नितीन घैसास उपस्थित होते

Akshata Chhatre

मडकई: श्री नवदुर्गा संस्थान मडकई येथे मंदिरातील मूर्ती हलवण्याचा वाद बराच वाढत चालला आहे. सोमवारी (०९ डिसेंबर) रोजी मंदिरात काही लोकांनी देवळातील पुजाऱ्यांना मारहाण केली. या प्रकारामुळे मडकई परिसरात बरीच खळबळ उडाली असून सध्या वातावरण चिघळले आहे. एकूण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंदिराच्या पुजाऱ्यांनी एक पत्रकार परिषद भरवली आणि यामध्ये गौरव घैसास यांच्यासोबत मंदिराचे मुख्य पुरोहित प्रशांत घैसास आणि नितीन घैसास उपस्थित होते.

मंदिराचे पुजारी गौरव घैसास यांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोकांनी पुजाऱ्याला दिले जाणारे नारळ किंवा इतर पैसे आणि वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, आणि पुजाऱ्यांनी देखील याला विरोध दर्शवला.

या विरोधामुळे वातावरण आणखीन पेटले आणि काही लोकांनी रागाच्याभरात मंदिरातून घरी येणाऱ्या विभव घैसास यांना मारहाण करायला सुरुवात केली. मंदिराच्या पुजाऱ्यांकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि यामध्ये सामील असलेल्या प्रत्येकाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी मंदिराचे पुजारी करतायत.

मंदिरात मूर्तीवरून सुरु असलेल्या वादात आमचा काही संबंध नाही असे गौरव घैसास यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून घैसास कुटुंबीय या मूर्तीची पूजा करत असल्याचं त्यांनी सांगितलं, पण आता मात्र हा विषय फक्त मुर्तीपुरता मर्यादित राहिलेला नसून मंदिरात येणारं उत्पन्न हिसकावून घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे आणि म्हणून ते अशा प्रकाराला विरोध करतायत. मंदिरात येणारा प्रत्येक भाविक हा आमच्यासाठी सामान आहे आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार पुजाऱ्याच्या वाट्याला येणाऱ्या उत्पन्नाचा आम्ही स्वीकार करतो असं घैसास म्हणालेत.

गावकरी का संतापले?

मंदिराच्या वादावरून गावकरी देखील संतापले असून मंदिरातील पुजारी मूर्तीवर किंवा मंदिरावर त्यांचा हक्क सांगू शकत नाहीत असे त्यांचे म्हणाले आहे. मंदिरातील देवी सर्वांची आहे आणि यावर कुणी एकटा अधिकार सांगू शकत नाही. मंदिरातील मूर्ती गेल्यास पुजाऱ्यांना त्यांचे उत्पन्न कमी होण्याची भीती वाटत आहे, आणि हे उत्पन्न कमी होईल म्हणून पुजारी मूर्तीच्या बाजूने मत मांडत होते, तसेच देवस्थानाच्या भाटांचा वापर उत्पन्न पिकवण्यासाठी करण्याच्या जागी पुरोहित घरं बांधण्यासाठी करतायत असे संतप्त गावकरी म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT