Goa Chamber of Commerce Dainik Gomantak
गोवा

Goa Chamber of Commerce: कॉन्कॉरचे बाळ्ळी येथील कंटेनर टर्मिनल त्रुटींचे आगर

Goa Chamber of Commerce: भागधारकांना भुर्दंड : गोवा चेंबर ऑफ कॉमर्सकडून पाहणी

दैनिक गोमन्तक

Goa Chamber of Commerce: कॉन्कॉरच्या बाळ्ळी येथील कंटेनर टर्मिनलमध्ये एक खिडकी सुविधा नाही, परिसरात उपहारगृहाची सोय नाही, अशा विविध समस्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुविधा समितीने केलेल्या पाहणीत आढळून आल्या आहेत. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गावस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेथे भेट देऊन ही पाहणी केली.

यावेळी टर्मिनल व्यवस्थापक आलेक्स जॉन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बाळ्ळी येथील लॉजिस्टिक भागधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे चर्चा करणे हा भेटीचा मुख्य हेतू होता. संवादादरम्यान अनेक मुद्दे मांडण्यात आले.

त्यात भागधारकांवर आकारले जाणारे उच्च संचयन शुल्क कमी करण्याची विनंती करण्यात आली. या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी अलग ठेवण्याची सोय नाही.

बिल ऑफ लेडिंगनुसार शिपमेंट पाठवली जात नसल्याची समस्या आहे. काही वेळा बिल ऑफ लेडिंगमध्ये ६ कंटेनर नमूद असल्यास केवळ पाच पाठवले जातात आणि एक डेपोमध्ये मागे राहतो, ज्यामुळे उर्वरित कंटेनर येईपर्यंत कंटेनर बंदरातच राहतात. या विलंबामुळे, खेप प्रलंबित राहते आणि भागधारकांना स्टोरेज शुल्क आणि वाहकाला डिटेन्शन शुल्क भरावे लागते त्यामुळे भागधारकांचा भार वाढतो. त्यामुळे पुढील प्रक्रियेतही विलंब होतो, असेही निदर्शनास आणून देण्यात आले.

आगराच्या मुख्य फाटकावर आरएफआयडी स्कॅनर उपलब्ध नाही, फेसलेस क्लिअरन्स दस्तऐवजांमुळे त्याच शिपमेंटसाठी वारंवार प्रश्न विचारले जातात. निर्यातदारांकडून अशी कागदपत्रे वारंवार मागावी लागणार नाहीत, अशी काही सुविधा निर्माण करावी, असे यावेळी सांगण्यात आले.

कार्यालय उपलब्ध करावे

बाळ्‍ळीतील हे आगार निर्यातदारांच्या कार्यालयापासून दूर आहे आणि काही वेळा कागदपत्रे गहाळ झाल्यास किंवा दुरुस्तीची आवश्यकता असल्यास संस्थेकडे परत जाणे कठीण होते. अशा घटना टाळण्यासाठी शिष्टमंडळाने विनंती केली की निर्यातदारांना कार्यालयीन जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी परत जावे लागणार नाही.

काही मुद्यांवर काम सुरू आहे. उपहारगृह सुविधेचे काम आधीच पूर्ण झाले आहे आणि पुढील आठवड्यात सुरू होईल. साठवणूक व इतर शुल्काबाबत अधिकारी काम करत असून येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून दरात बदल करण्यात येणार आहे. लोकांचे वैयक्तिक साहित्य हलविण्यासाठी कंटेनरची सुविधाही विचारात आहे.
— आलेक्स जॉन, टर्मिनल व्यवस्थापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

Middle East War: युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'! राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी आखली लक्ष्मणरेषा; ठेवल्या 'या' 3 अटी

SCROLL FOR NEXT