Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेची चिंता वाढली

दोन प्रकरणांचा धसका; 30 कोटींपेक्षा जास्‍त द्यावी लागणार भरपाई

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिकेसमोर सध्या दोन आर्बिट्रेशनची (लवाद) प्रकरणे आहेत. त्यातील एक गांधी मार्केटमधील इमारतीचे प्रकरण अंतिम टप्प्यात आहेत तर दुसरे प्रकरण आहे ते सोनसोडोवरील कचरा प्रक्रिया प्लांटचे. ते विरोधात गेले तर पालिकेला सुमारे 30 कोटींपेक्षा जास्‍त भरपाई द्यावी लागणार आहे. गांधी मार्केटमधील प्रकरणातील भरपाई साधारण 60 लाख रुपये आहे.

या प्रकरणी अजून सुनावणी झालेली नसली तरी एक ना एक दिवस ती होणार आहे. त्‍यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पालिकेने या प्रकरणी प्रतिदावा गुदरण्याचा निर्णय घेतला असल्‍याचे समजते. असा दावा दाखल करण्यासाठी तीन वर्षे मुदत आहे. पालिकेने त्याबाबत घाई न केल्यास ती मुदत संपेल व नंतर काही करता येणार नाही ही बाब नगरसेवकांनी लक्षात आणून दिली व गांधी मार्केट इमारतीबाबत तेच झाल्याचे स्‍पष्‍ट केले. त्या प्रकरणात पालिकेने तडजोड केल्यास दहा ते पंधरा लाखांत प्रकरण मिटले असते व ती रक्कम आता 60 लाखांवर गेली आहे. त्यामुळे सोनसोडो आर्बिट्रेशन प्रकरण पालिकेला महागात पडू शकते.

फोमेंतोने गुदरला आहे खटला

काल बुधवारी झालेल्या पालिकेच्या खास बैठकीत हा आर्बिट्रेशनचा मुद्दा आला तो केवळ सोनसोडोवरील कचरा प्लांटप्रकरणी फोमेंतोच्‍या दाव्यापुरता मर्यादित होता. प्रत्यक्षात फोमेंतोने 25 वर्षांसाठी सदर प्रकल्पाबाबत पालिकेशी करार केला होता, पण सात वर्षांतच त्‍या कंपनीने अंग काढून घेतले. त्यामुळे पालिकेने त्याचे पुढचे हप्ते फेडले नाहीत. परिणामी फोमेंतोनो 30 कोटींची भरपाई मागून आर्बीट्रेशनचा दावा गुदरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT