Goenkars Portuguese Connection and Indian Passport: Dainik Gomantak
गोवा

पोर्तुगीज कनेक्शन असलेले गोमंतकीय चिंतेत? भारतीय पासपोर्टशी संबंधित आहे प्रकरण...

गोव्यात किमान 100 नागरिकांचे भारतीय पासपोर्ट रद्द

Akshay Nirmale

Goenkars Portuguese Connection and Indian Passport: भारतावर इंग्रजांचे राज्य होते पण गोव्यावर मात्र पोर्तुगीज अंमल होता. त्यामुळेच गोव्याचे आणि पोर्तुगालचे विशेष असे संबंध आहेत. गोव्यातील नागरिकांचे पोर्तुगालमध्ये नातेवाईकही आहेत आणि बऱ्याचदा गोव्यातील नागरिकांच्या जन्माची नोंद पोर्तुगालमध्येही केली जाते.

शिवाय अनेक गोवेकर पोर्तुगीज पासपोर्ट मिळवतात. त्यावेळी त्यांना भारतीय पासपोर्ट सरेंडर करावा लागतो. त्यातूनच आता अशा गोवेकरांना चिंतेत पडायची वेळ आली आहे. यातूनच गेल्या काही काळात गोव्यातील किमान १०० नागरिकांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.

उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील कांदोळी येथील रहिवासी थॉमस फर्नांडिस यांनी नोव्हेंबर अखेरीस भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी पणजी येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय गाठले.

तथापि, फर्नांडिस यांनी महत्त्वाची माहिती लपवल्याच्या कारणावरून त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. 2021 मध्ये जेव्हा ते भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण करत होते तेव्हा त्यांनी आधीच पोर्तुगालचे नागरिकत्व सुरूवात केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे परिपत्रक

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 2015 मध्ये फर्नांडिस यांनी पोर्तुगीज नागरिकत्व घेतले होते. त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. त्या नोटीसमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाच्या 30 नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकाचा उल्लेख करण्यात आला होता.

पासपोर्ट कायदा 1967 च्या कलम 10 चा वापर करून पासपोर्ट रद्द केला जाऊ शकतो, असे परिपत्रकात म्हटले आहे. कारण हा पासपोर्ट परदेशी नागरिकत्वाची माहिती लपवून मिळवला होता. नियमांनुसार, हे लोक भारतीय पासपोर्ट मिळविण्यास किंवा त्यासाठी अर्ज करण्यास पात्र नव्हते.

सरेंडरशिवाय ओसीआय कार्ड नाही

थॉमस फर्नांडिस यांनी म्हटले होते की, मला या परिपत्रकाची माहिती नव्हती. पोर्तुगीज पासपोर्ट न मिळवताही, गोवा लोक बऱ्याच काळापासून पोर्तुगालमध्ये त्यांच्या जन्माची नोंदणी करत आहेत. पूर्वी भारतीय पासपोर्ट सरेंडर करणे चांगले मानले जात नव्हते.

असे केल्याबद्दल, दंड आकारला जात होता तसेच सरेंडर सर्टिफिकेट जारी केले जात होते. त्या सर्टिफिकेटशिवाय व्यक्ती ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डसाठी अर्ज करू शकत नाहीत.

100 लोकांचे भारतीय पासपोर्ट रद्द

दरम्यान, गोव्यात गेल्या काही महिन्यांत किमान 100 लोकांचे भारतीय पासपोर्ट रद्द केले गेले आहेत. या नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाच्या परिपत्रकाची माहिती नव्हती आणि ते त्यांचे भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी गेले होते.

कारण त्यांची ओसीआय कार्ड बनवण्याची प्रक्रिया थांबली होती. या प्रकरणामुळे गोवावासीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही गोवासीयांना X-1 व्हिसासाठी (एंट्री व्हिसा) अर्ज करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

सोमवारी, एका शिष्टमंडळाने “गोअन्स फॉर गोवा” या बॅनरखाली एनआरआय व्यवहार विभागाच्या आयुक्तांची भेट घेतली आणि रद्द केलेल्या पासपोर्ट धारकांसाठी अॅम्नेस्टी पिरियड वाढवण्याची सरकारला विनंती केली जेणेकरून ते OCI कार्डसाठी अर्ज करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Satyapal Malik: घटनात्मक पदावर असतानाही सरकारविरुद्ध उघडपणे बोलणारे, बेधडक सत्य सांगणारे 'सत्यपाल मलिक'

Goa: 'कर्ज काढून सण साजरे केले नाहीत', मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; मतदारसंघासाठी 100 कोटींची तरतूद केल्याची दिली माहिती

Rashi Bhavishya 06 August 2025: तांत्रिक कामे किंवा इलेक्ट्रॉनिक बाबतीत दक्षता घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

SCROLL FOR NEXT