Goa dairy Dainik Gomantak
गोवा

दुधाच्या अल्प पुरवठ्यामुळे राज्यात चिंता

विक्रेत्यांमध्ये नाराजी : मागणीत वाढ, दररोज चार लाख लिटरची गरज

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात दररोज बाजारात स्थानिक उत्पादकांकडून सुमारे दीड लाख लिटर दूध विक्रीसाठी येते, परंतु राज्याची दुधाची मागणी सुमारे चार लाख लिटरांवर पोहोचली आहे. त्यामुळे गोवा डेअरी एवढा पुरवठा वाढवू शकत नाही किंवा त्यांच्याकडे तेवढे दूध संकलनही होत नाही. तर दुसरीकडे बाजारात विक्रेत्यांकडे दररोजच्या मागणीपेक्षाही कमी दूध येत असल्याने त्यांच्यातही नाराजीचा सूर दिसून येत आहे.

(Concern in goa state due to short supply of milk)

राज्यात दररोज 1 लाख 60 हजारांवर दूध उत्पादन होत असल्याची माहिती नुकतीच पशुसंवर्धन मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली. त्यात गोवा डेअरीकडे सध्याच्या घडीला 43 हजार लिटर दूध संकलीत होते. त्याऐवजी समुल व इतर दूध संघातही स्थानिक दूध उत्पादक दूध दररोज देत आहेत. सध्या गोवा दूध संघावर नवे संचालक मंडळ आले आहे. तत्पूर्वी या संघाचा कारभार प्रशासकाच्या हाती होता. परंतु प्रशासकांनी परराज्यातून येणाऱ्या दुधाविषयी निविदा प्रक्रिया केलीच नाही. त्यामुळे परराज्यातील दूध संघाकडून दूध घेण्यावर रोख लागला.

उपपदार्थ उत्पादनावर परिणाम

गोवा दूध संघाचे बाजारात एक व अर्धा लिटरच्या पिशव्या बाजारात येतात. एक लिटरच्या दुधाला अधिक मागणी असल्याने ते अधिक प्रमाणात साठा ठेवू शकत नाहीत. त्याशिवाय संकलन कमी होत असल्याने दूध संघाच्या इतर उपपदार्थांच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गोवा दूध संघाकडे दररोज 43 हजार लिटर दूध येते आणि तेवढेच दूध बाजारात विक्री होते. सध्या अनेक विक्रेत्यांच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. डेअरी यापूर्वी तफावत पाहून संघ परराज्यातील दूध संघांकडून दूध घेत होते. निविदा काढली नसल्याने दुधाची टंचाई भासत आहे.

- राजेश फळदेसाई, नूतन अध्यक्ष, गोवा डेअरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT