Goa Comunidade Dainik Gomantak
गोवा

Comunidade of Goa: जमीन हस्तांतरणावेळी विश्वासात घेण्याची कोमुनिदादची मागणी

कोमुनिदाद संस्थांचा कायद्यावर मुळीच विश्र्वास नाही

दैनिक गोमन्तक डिजिटल

Comunidade of Goa: राज्य सरकारने कृषी जमीन निर्बंध हस्तांतरण कायदा 2023 मंजुर केला असून त्यात कोमनिदादींना त्यांच्या कृषी जमिनीचे संरक्षण देण्याची तरतूद आहे.

त्यामुळे यापुढे कोमुनिदादींना कृषी जमिनीसंदर्भात विश्र्वासात घेतले जाईल व निर्णय घेताना त्यांच्या मतांचाही विचार केला जाण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारने या कायद्याला जरी मंजुरी दिली असली, तरी कोमुनिदाद संस्थांचा त्यावर मुळीच विश्र्वास नाही.

हा कायदा म्हणजे कोमुनिदादच्या कृषी जमिनीत राजकीय व सरकारी हस्तक्षेप आहे असे त्यांचे म्हणणे असून सरकारने जमीन हस्तांतरणावेळी आम्हाला विश्वासात घ्यावे, असे सासष्टी कोमुनिदादच्या सदस्यांनी म्हटले आहे.

सासष्टी तालुक्यातील एकूण कृषी जमिनीपैकी 70 ते 80 टक्के जमीन सासष्टी कोमुनिदादच्या मालकीची आहे. केवळ 30 टक्के जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. त्याचप्रमाणे सासष्टी तालुक्यात जवळजवळ 5200 हॅक्टर भात शेत जमीन लागवडीखाली आहे.

गत पाच वर्षांत सासष्टीत भात शेती लागवड जमिनीत 225 हेक्टरनी वाढ झाली आहे. सासष्टीतील जास्त शेतकरी केवळ मुंडकार म्हणूनच भाताची लागवड करतात. राज्य सरकारच्या या कृषी कायद्यामुळे काहींच्या मते त्याचा फायदा सामुदायिक शेतीला मिळू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT