Assagao Plateau Garbage Dumping Site  Dainik Gomantak
गोवा

Assagao News: म्हापसा पालिकेची पोलखोल! आसगाव पठारावर कचऱ्याच्या राशी; न्यायालयाच्या आदेशानंतरही 'डंपिंग'

Assagao Plateau Garbage Dumping Site: आसगाव पठारावर कचरा टाकू नये, असे उच्च न्यायालयाचे निर्देश असताना, म्हापसा पालिका न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करून सर्रासपणे या जागेत कचरा आणून टाकत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Assagao Plateau Waste Dumping Site Inspection Highlights Mapusa Municipal Negligence

म्हापसा: आसगाव पठारावर कचरा टाकू नये, असे उच्च न्यायालयाचे निर्देश असताना, म्हापसा पालिका न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करून सर्रासपणे या जागेत कचरा आणून टाकत आहे.

याची गंभीर दखल घेत, आसगाव कोमुनिदादने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूलमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार, मंगळवारी (ता.२९) ‘जीपीएसबी’ने आसगाव कोमुनिदाद, घनकचरा व्यवस्थान अधिकाऱ्यांसोबत या जागेची संयुक्त पाहणी केली. या पाहणीअंतर्गत म्हापसा पालिकेची पोलखोल झाली आहे.

आसगाव पठार हा आसगाव कोमुनिदादच्या मालकीची जागा आहे. या जागेवर मागील अनेक वर्षे म्हापसा पालिकेकडून शहरातील कचरा आणून टाकला जायचा. त्यानंतर तिथे कचऱ्याचे वर्गीकरण व्हायचे. परिणामी, या कचऱ्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी तसेच कचऱ्याचे पाणी झिरपून त्यामुळे आसगाव परिसरातील लोकांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

त्यामुळे आसगाव कोमुनिदादने उच्च न्यायालयात धाव घेत, याविषयी याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने म्हापसा पालिकेला यास्थळी कचरा टाकू नये, तसेच कचरा व्यवस्थापनासाठी व्यवस्था करण्यास सांगितले होते. कालांतराने, म्हापसा पालिकेने कुचेली येथे प्रकल्प उभारला. तरीही अजून पालिका अधूनमधून या आसगाव पठारावर कचरा आणून टाकत असल्याने हा विषय सध्या कळीचा मुद्दा बनला आहे.

शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण हे कुचेली प्रकल्प तसेच इतरत्र कंपोस्टिंग जागेतच पालिकेकडून केले जाते. मात्र, हॉट-स्पॉटवर कचरा फेकला जातो, तो इथे आणून नंतर त्याचे वर्गीकरण करतो, असा दावा म्हापसा पालिकेतील अभियंत्यांनी माध्यमांसमोर केला. तसेच अधिक बोलण्यास अभियंत्यांनी टाळले.

म्हापसा पालिकेने खबरदारी घ्यावी

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अभियंता धीरज चोडणकर म्हणाले की, आज संयुक्त पाहणी केली. २०१९मध्ये पहिल्या टप्प्यात १.५२ लाख घनमीटर कचरा पालिकेने साफ केला होता. त्यानंतर २०२२मध्ये आम्ही कुंपण घातले होते. जेणेकरून पुन्हा डम्पिंग होऊ नये.

याठिकाणी कचरा टाकू नये म्हणून अनेक पत्रव्यवहारदेखील केले. साळगाव कचरा प्रकल्पस्थळी कचरा व्यवस्थापनाचा पर्याय ठेवला होता. त्यासाठी १० टन ओल्या कचऱ्यासाठी अधिकृतता दिली होती. त्यापैकी केवळ ४ ते ५ टन कचरा दररोज आणला जातो.

म्हापसा पालिका दररोज सरासरी २५ टन कचरा निर्मिती करते. त्यापैकी १५ टन कचरा ओला असतो. म्हापसा पालिकेने यास्थळी कचरा डंप करणे थांबवावे व आवश्यक खबरदारी घ्यावी. याची उच्च अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT