Saint Francis Xavier Exposition 2024 Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier : ..आणि सोळाव्या शतकातील फ्रान्सिस बनला 'गोंयचा सायब'; फेस्तानिमित्त जाणून घ्या सेंट झेवियर यांची संपूर्ण 'काणी'

Saint Francis Xavier Exposition: आज सेंट झेव्हियर यांचे फेस्त असून या फेस्ताला यंदा वेगळेच वलय आहे. कारण यंदाच्या फेस्तवेळीच सेंट झेव्हियरच्या अर्थात गोंयच्या सायबाच्या पार्थिवाचेही प्रदर्शन होत आहे. यासाठी जगभरातील भाविक जुने गोवेत दाखल होत आहेत. या योगायोगामुळे यंदा फेस्ताला निराळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Saint Xavier's life, works and feast day

एक दिवस बोलता बोलता इग्नॅशियस फ्रान्सिसला म्हणाला, फ्रान्सिस सर्व जग जिंकून तू तुझा आत्मा हरवलास तर काय फायदा? त्या एकाच वाक्याने आपल्याच जगात वावरणारा फ्रान्सिस भानावर आला. आपण कुठेतरी चुकतोय, असे त्याला वाटू लागले. हा प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होता.

पहाटे फ्रान्सिसने आपले डोके इग्नॅशियसच्या पायावर ठेवले आणि त्याला जाग आल्यावर शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. फ्रान्सिसने कडक तपश्चर्या केली. आता फ्रान्सिस, फ्रान्सिस राहिला नव्हता. तो पूर्णतः बदलला होता. स्वैराचारी फ्रान्सिस पूर्णतः देवमय झाला होता.

सोळाव्या शतकात फ्रान्सिस झेव्हियर यांचा जन्म मंगळवार, ७ एप्रिल १५०६ रोजी स्पेनच्या नवारा प्रांतातील इस्पान्हा देशातील झेव्हियर किल्ल्यात झाला. त्यांचे घराणे राजघराणेच होते. नवारा राजाचे तत्कालीन ज्येष्ठ सरदार येडॉन जुआंव देजासो आतोंडो आणि मारिया आजणार हांवीयेर यांचे ते पाचवे अपत्य. मोठ्या दोन बहिणी माग्दालीना आणि आन्ना, तर मिंगेल आणि जुआंव हे त्यांचे भाऊ होत.

त्यांचे खरे नाव फ्रान्सिस आतोंडो, पण त्यांची आई मारिया हिला एकूलती लेक म्हणून तिच्या वडिलांनी लग्नाच्यावेळी दिलेल्या झेव्हियर या किल्ल्याचेच नाव फ्रान्सिसने आपले आडनाव म्हणून धारण केले. फ्रान्सिस नऊ वर्षांचा असताना त्याचे वडील वारले.

नऊ वर्षांचा फ्रान्सिस झेवियर किल्ल्याचा अधिकारी झाला. त्याची आई मारिया हुशार, कर्तबगार आणि धोरणी होत्या. त्यांनीच फ्रान्सिसला शिकवले. आपली शिक्षणाची हौस आणि भक्तीची ओढ आपल्या आईनेच पक्की केली, असे फ्रान्सिस नम्रपणे म्हणायचे.

त्याची शिक्षण आणि भक्तीप्रेमाची भूक वाढत होती. १५२२ साली पांप्लोनच्या धर्मप्रांतात जाण्याच्या उद्देशाने फ्रान्सिसने आपल्या डोक्याचे मुंडण केले. त्याच दरम्यान त्याचे भाऊ परत आले आणि १९ वर्षांच्या फ्रान्सिसला १५२५ साली पुढील शिक्षणासाठी पॅरिसला पाठवले. तथे सांता बाबाच्या कॉलेजात त्याने आपले नाव नोंदवले.

हुशार आणि तडफदार फ्रान्सिसने १५३० साली पॅरिस विद्यापीठाची एमएची पदवी घेतली आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्याची स्वतंत्र खोली होती. घरकामासाठी नोकर होता. त्याला घरून पैसे यायचे. त्यात पगाराच्या पैशांची भर पडली आणि फ्रान्सिसची चैनबाजी सुरू झाली.

संत फ्रान्सिस झेव्हियर खोलीचे भाडे भरणे अशक्य झाल्याने खोलीत पेद्र फाबरे हा जोडीदार घेतला. पेद्र धार्मिक वृत्तीचा होता. पुढे त्याच खोलीत धार्मिक कार्याची विशेष ओढ असलेला इग्नॅशियस लोयोला आला. तो दोघांना अभ्यासाचे धडे द्यायचा आणि बदल्यात अध्यात्माविषयी सांगायचा. एक दिवस बोलता बोलता इग्नॅशियस फ्रान्सिसला म्हणाला, फ्रान्सिस सर्व जग जिंकून तू तुझा आत्मा हरवलास तर काय फायदा?

त्या एकाच वाक्याने आपल्याच जगात वावरणारा फ्रान्सिस भानावर आला. आपण कुठेतरी चुकतोय, असे त्याला वाटू लागले. हा प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होता. पहाटे फ्रान्सिसने आपले डोके इग्नॅशियसच्या पायावर ठेवले आणि त्याला जाग आल्यावर शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. फ्रान्सिसने कडक तपश्चर्या केली. आता फ्रान्सिस, फ्रान्सिस राहिला नव्हता. तो पूर्णतः बदलला होता. स्वैराचारी फ्रान्सिस पूर्णतः देवमय झाला होता.

१५५६ साली त्यांना पांप्लोनच्या चर्चचे प्रमुख धर्मगुरुपद मिळाले. ते झिडकारून १५३७ साली ते व्हेनिसला पोचले. १५४० साली पूर्वेकडचा आपला प्रतिनिधी म्हणून पोपनी त्यांची नेमणूक करून त्यांना भारतात जाण्याचा हुकूम दिला. १५४१ साली सेंट फ्रान्सिस झेव्हियर हे लिस्बन येथून रवाना झाले. जहाजातून प्रवास करीत ६ मे १५४२ साली ते गोव्यात पोचले.

लिस्बनहून गोव्यात येण्यासाठी १ वर्ष १ महिना ४ दिवस लागले. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते धर्म प्रसाराच्या कार्यात व्यग्र असायचे. गोव्याहून वसई, त्रिवेंद्रम, चेन्नई (मद्रास), मैलापूर, मलाया, मलाक्का, इंडोनेशिया, फिलीपाईन, जावा, बोर्नियो, जपान असा प्रवास करून त्यांनी धर्माचा प्रसार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT