Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: स्मार्ट सिटीबाबतची कामे वेळेवर पूर्ण करा- सावंत

अधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड, गोवा अर्बन डेव्हलपमेंट तसेच रस्ते आणि मलनिस्सारण विभाग अधिकाऱ्यांसमवेत आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांना गती प्राप्त व्हावी आणि कामे वेळेवर पूर्ण व्हावीत या दृष्टीने चर्चा झाली.

मागील काही दिवसांत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु असून रस्ते खोदाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच खोदकामांमुळे ट्रक कलंडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. एकंदरीत या सर्व त्रासापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी कामे वेळेवर पूर्ण होणे गरजेचे आहे.

तसे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे एजन्सींनी राजधानी पणजी शहरातील सीवरेज नेटवर्क, युनिव्हर्सल वॉकवे, स्मार्ट रोड आणि कल्व्हर्ट/ पुलांच्या अपग्रेडेशनची कामे हाती घेतली आहेत.

हि कामे देखील लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Market Leakage: पावसाळा आला की व्यापाऱ्यांची कसरत; डिचोली बाजार संकुलातील गळतीची समस्या अजूनही कायम!

न अन्न, न औषध, न इंधन! POK मध्ये पाकड्यांची दादागिरी, काश्मीरी जनतेच्या मुळावर उठलं शाहबाज सरकार; लोकशाहीचा फाटला बुरखा

Dhargal Flyover Project: उड्डाणपूल बांधकामाचा वाहकांना फटका; धारगळ मार्गावर वाहतूक विस्कळीत, उपाययोजनांची मागणी

Goa Detention Policy: पाचवी-आठवीत नापास धोरण लागू करा! केंद्राकडून गोव्याला तंबी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबाबतही चिंता

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT