Cuncolim Industry Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Industry: कुंकळ्‍ळीतील प्रदूषणाबाबत ‘मानवाधिकारा’कडे तक्रार

Cuncolim Industry: गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रदूषणाचा सामना करणाऱ्या स्थानिकांना तो मान्य नाही.

दैनिक गोमन्तक

Cuncolim Industry: गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रदूषणाचा सामना करणाऱ्या स्थानिकांना तो मान्य नाही. याबाबत कुंकळ्ळीतील रहिवासी विजय प्रभू यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महासचिवांकडे लेखी तक्रार केली आहे.

मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि त्यांची टीम औद्योगिक वसाहतीतील मासळी प्रक्रिया प्रकल्प व लोह उत्पादक कारखान्यातून होणारे घातक प्रदूषण नियंत्रित करण्यात अपयशी ठरले आहेत, असे प्रभू यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

आता गेल्या चार महिन्यांपासून ते चिंताजनक प्रमाणात वाढले आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाची पातळी खूप वाढली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडलाच्या दुर्लक्षामुळे जनतेचे जगणे असहाय झाले आहे.

फिश प्लांट्स आणि स्टील प्लांट्समुळे होणारा दुर्गंधी आणि वायू प्रदूषणाचा त्रास खूपच भयानक आहे. त्यामुळे स्थानिकांना ताजी हवाही मिळत नाही, असेही प्रभू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पाटील आणि त्यांची टीम देखील या गोंधळाला जबाबदार आहे. याबाबत मानवाधिकार आयोगाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

SCROLL FOR NEXT